घुग्घूस शहरात कायमस्वरूपी तहसील कार्यलय उपलब्ध करून द्या… — काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

घुग्घूस : जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेले तसेच जिल्ह्यातील सर्वात शेवटचे शहर असलेल्या घुग्घूस येथील शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थ्यांना, व्यापाऱ्यांना शासकीय कामाकरिता 27 किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्रपूर तहसील कार्यलयात जावे लागते शासकीय कामे वेळेवर होत नसल्याने वारंवार तहसील कार्यलयात चकरा टाकाव्या लागत असल्यामुळे नागरिकांना आर्थिक शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो शालेय विद्यार्थ्यांचे डोमिसाईल, उत्पन्नाचा दाखला व अन्य कामे वेळेवर होत नसल्याने घुग्घुस शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजुरेड्डी यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा तसेच खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना शहरात कायमस्वरूपी अप्पर नायब तहसीलदार कार्यलय निर्माण करावे अशी मागणी निवेदनातून केली आहे.

           घुग्घूस शहरातील लोकसंख्या जवळपास 50,000 इतकी असून याठिकाणी 1999 साली जनतेची मागणी लक्षात घेता शासनाने नायब तहसीलदार कार्यलय सुरु केले.

        या कार्यलयात नायब तहसीलदार कारकून व शिपाई असे कर्मचारी होते.

         मात्र सध्या हे कार्यलय शोभेचे बाहुले झाले असून गेल्या काही वर्षांपासून या कार्यलयात कोणतेही कर्मचारी नसून या कार्यलयावर राजस्व विभागाचे तलाठी व मंडळ अधिकारी यांचा कब्जा असून स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनी रेकॉर्ड वरील नायब तहसीलदार येऊन ध्वजारोहन कार्यक्रम करतात.

         सदर ठिकाणी कायमस्वरूपी तहसील कार्यलय सुरू झाल्यास शहरासह परिसरातील नकोडा, उसगाव, वडा, पांढरकवडा, शेणगाव, मातारदेवी, सह अनेक गावातील नागरिकांना या तहसील कार्यलयाचा लाभ होणार असल्यामुळे शासनाने तातळीने यागंभीर प्रकरणाकडे लक्ष द्यावे अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

           शिष्टमंडळात काँग्रेस नेते सैय्यद अनवर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, जिल्हा महासचिव अलीम शेख, तालुका सचिव विशाल मादर,मोसीम शेख,नुरूल सिद्दीकी,रोहित डाकूर,बालकिशन कुळसंगे, विजय माटला,सुनील पाटील, कुमार रुद्रारप,अभिषेक सपडी, कपिल गोगला, अरविंद चहांदे,आयुश आवळे,अंकुश सपाटे व मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.