
उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
महावितरण कार्यालय वरोरा तसेच रोषनी फाउंडेशन व माधव नेत्रालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महावितरण कार्यालय वरोरा येथे निशुल्क नेत्र तपासणी शिबिर तसेच नेत्रदान जागरूकता शिबिर व मोतीबिंदू निदान व निशुल्क मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन दिनांक 4 फरवरी 2025 रोजी महावितरण वरोरा विभाग येथे करण्यात आले होते.
यामध्ये महावितरण मधील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच महावितरणच्या परिसरातील व्यक्तींनी देखील सहभाग नोंदविला.यामध्ये एकूण 130 लोकांच्या नेत्र तपासण्या निशुल्क करण्यात आल्या व मरणोत्तर नेत्रदानाबाबत रोशनी फाउंडेशनच्या वतीने गैरसमज नष्ट केल्याने तसेच नेत्रदान विषयी जागरूक केल्याने एकूण 66 लोकांनी नेत्रदानाचे संकल्प घेऊन नेत्रदानात आपले योगदान दिले.
यावेळी माधव नेत्रालयातर्फे डॉक्टर यांनी मोलाचे योगदान देऊन सर्व नेत्र तपासण्या केल्या व रोशनी फाउंडेशन तर्फे श्री.राजेंद्र जैन,श्री.भागीरथ साहू,श्री.सुभाष नाफड़े,श्री.दशरथ कळंबे,श्री.मधुकर वनकर, श्रीधर दफ्तरी,श्री.अनिल माटे,श्री.अनुपम शुक्ला,श्री.यादव लक्षणे,श्री.सुरेश अगडे यांनी नेत्रदान व जनजागृती केल्याने 130 पैकी 66 लोकांनी नेत्रदान करण्याचा संकल्प घेतला.
तसेच महावितरण वरोरा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.विलास नवघरे यांच्या पुढाकाराने व श्री.संजय जळगावकर,श्री.राहुल पावडे,श्री.सचिन बदखल,श्री.भालचंद्र घोडमारे,श्री.देवेंद्र धनंजोडे,श्री.अविनाश देवतळे,श्री.विवेक माटे,यांच्या सहकार्याने खालील प्रमाणे लोकांनी नेत्रदानाचा संकल्प घेतला.
***
स्वेच्छेने नेत्रदानाचा संकल्प घेणारे पुढील प्रमाणे….
श्री.विलास दामोदर नवघरे,श्री.निलेश गुरनुले,श्री.विपिन कोचे,श्री.सचिन बनकर,श्री.किशोर तुराणकर,श्री.प्रफुल लालसरे,श्री.वैभव जुमडे,पल्लवी भौमिक,श्री.सत्यराज वावरे,श्री.अमोद रंदये,श्री.सेमोन साहू,श्री.अविनाश देवतळे,श्री.रुपेश निरंजने,श्री.दत्ता चौधरी,पूनम चौधरी,श्वेता मोरे,श्री.पंकज चव्हाण,श्री.प्रफुल सारडा,श्री.भूषण गायकवाड,श्री.जनार्दन जुमणाके,ज्योत्स्ना जाधव,वर्षा आसुटकर,वर्षा सोमलकर,सोनू हनुमंते,श्री.नामदेव कोरेटी,श्री.अनिल भट,श्री.प्रशांत ढोके,श्री.भूषण म्हैसकर,मनीषा कोल्हे, श्रीमती रेखा पेठकर,मंजुताई मोरे,विद्याताई मानके,संगीता मडावी,उर्मिला आतकर,माया कडवे,प्रमिला भानारकर,सारिका ढोके,नम्रता गायकवाड,नंदा गायकवाड,नैना चव्हाण,श्रद्धा सारडा ,देवकाबाई सारडा,अंतरा भौमीक,मृणाल भौमीक,श्री.अभिजीत भौमिक,श्री. दिवाकर मडिवार,श्री.दिनेश सेलवटकर,श्री.आनंद निखारे,श्री.नत्थुजी मानकर,श्री.आदित्य दाते,श्री.सुरेश तुरणकर,सौ.सुनंदा तुरणकर,सौ.वैशाली विलास नवघरे,श्री.प्रसाद कडवे,सौ.पल्लवी जुमडे,कुमार सोमेश जुमडे,श्री.निलेश जाधव,श्री.रवी जाधव,श्री.राजेंद्र भरडे,श्री सुशांत निमगडे,सारिका नीमगडे,श्री.जितेंद्र काळे,श्री.लक्ष्मण सेलवटकर,श्री.विवेक माटे,सौ.रंजना माटे,इत्यादी लोकांनी मरणोपरांत नेत्रदान करण्याचा संकल्प घेतला आहे.
तर सदर कार्यक्रमास श्री.शकील शेख,भूषण म्हैसकर, अजिंक्य वाभीटकर,धनराज मेश्राम,पिंटू भाऊ शेंडे,यांचे विशेष सहकार्य लाभले.
सदर शिबिर यशस्वी करण्याकरता श्री.विलास नवघरे साहेब यांचे संपूर्ण वरोरा विभागातर्फे आभार मानण्यात आले.
तसेच रोशनी फाउंडेशन नागपूर आणि माधव नेत्रालय नागपूर यांचे सुद्धा आभार मानण्यात आले.