आळंदीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ८०० जनांची आरोग्य तपासणी… 

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदी शहर शिवसेनेच्या वतीने भव्य आरोग्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ८०० नागरीकांनी या शिबिराचा लाभ घेतला असे शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण यांनी सांगितले.

         या शिबिराला डि.डि.भोसले पाटील, सचिन गिलबिले, प्रकाश कुऱ्हाडे, दिनेश घुले, कैलास घेनंद, नंदकुमार वडगावकर, ज्ञानेश्वर रायकर, पुष्पाताई कुऱ्हाडे, संगिता फपाळ, मंगल हुंडारे, राहूल थोरवे, माऊली घुंडरे, सायरा शेख, मनिषा थोरवे, विनायक महामुनी, नितीन ननवरे, मनोहर दिवाणे, नामदेवराव मुंगसे, श्रध्दा थोरवे, डॉ.विकास थोरवे, डॉ.सुनील वाघमारे, डाॅ.भुषण जगताप, डाॅ.अक्षय शिंगणे, डाॅ.निलेश जगदाळे, डॉ.खुशांत त्रिवेदी उपस्थित होते. 

         शहरप्रमुख राहुल चव्हाण यांच्या माध्यमातून आयोजित महा आरोग्य शिबिरात मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, मोफत आरोग्य तपासणी करण्यात आले याप्रसंगी सुर्या नेत्रालय, कमलेश हाॅस्पिटल व स्वास्थ्य क्लिनिक यांचे सहकार्य लाभले.

         नागरिकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक ती माहिती आणि साधनं उपलब्ध करून देणे हेच शिबीराचे मुख्य ध्येय आहे. चष्मे आणि आरोग्य तपासणी शिबीराने नागरिकांच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल जागरूकता निर्माण केली आहे आणि त्यांना योग्य उपचारासाठी मार्गदर्शन मिळाले आहे. शिवसेना ही नेहमीच लोककल्याणासाठी कटीबद्ध आहे असे शहरप्रमुख राहुल चव्हाण यांनी सांगितले.