कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:- शिक्षण विभाग पंचायत समिती पारशिवनी द्वारा आयोजित जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा दोन दिवसीय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव हरिहर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पारशिवनी येथे थाटात संपन्न झाला.
या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद नागपूरच्या शिक्षण व अर्थ समितीचे सभापती राजकुमार कुसुुंबे यांचे शुभहस्ते क्रीडा ध्वज फडकावून आणि क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती मंगला उमराव निंबोने होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती करुणा भोवते, जिल्हा परिषद सदस्या रश्मी बर्वे, अर्चना दिपक भोयर, पंचायत समिती सदस्या मीना प्रफुल्ल कावळे, तुलसी प्रदिप दियेवार, सहाय्यक गट विकास अधिकारी चंद्रकांत देशमुख, रुपेश खंडारे, सचिन सोमकुवर, तालुका गट शिक्षणाधिकारी वंदना हटवार, प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी लता माळोदे प्रामुख्याने उपस्थित होते.
दोन दिवसीय या महोत्सवात पारशिवनी, नवेगाव खैरी आणि कान्हन या बीट स्तरावरून विजयी झालेले संघ सहभागी झाले होते. आता हे संघ विभागीय खेळ मौदा येथे होणार येथे विजयी संघ खेळणार आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालासावळी ( कबड्डी मुले),
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढवळापूर (कबड्डी मुली),
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोरली (खो खो, मुले, मुली),
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आवळेघाट ( लंगडी आणि लोकनृत्य)
तर वरिष्ठ गटात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खंडाळा डूमरी (कबड्डी मुले),
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सालई मोकासा (कबड्डी मुली, खो खो मुले व मुली, रीले रेस मुले),
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केरडी (लंगडी), जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोरली (रिले रेस मुली, समूह गीत),
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इटगाव (लोकनृत्य),
या शाळा सांघिक खेळात तर वैयक्तिक खेळात सूरज बावनकुळे , कीर्ती टोहने (उंच उडी), खुशरंग सेंगरे, रुचिका वरखेडे (लांब उडी), अफजल फहीम, कीर्ती तोहणे (२०० मी. दौड), निखिल चौधरी, सेजल वानखेडे (१००मी.दौड), दीक्षा तुपट (बुद्धीबळ), सुमित कंगाले, रणवीर सोनवाणे,नयन सोनटक्के (कुस्ती), खुशबू कामडे (पालोरा), प्रियांशी शेडके (नक्कल), चंचल चौरीवार (वक्तृत्व) हे विद्यार्थी विजेते ठरले.
पंचायत समिती पारशिवनीच्या सभापती मंगला उमराव निंबोने यांचे अध्यक्षतेखाली उपसभापती करुणा भोवते, गट विकास अधिकारी सुभाष जाधव, गट शिक्षणाधिकारी वंदना हटवार, प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी लता माळोदे, स्वच्छता समन्वयक मुनेश दुपारे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण व समारोप समारंभात विजेत्यांना शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती कळंबे, राजेश माहुरकर, खुशाल कापसे यांनी, प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी वंदना हटवार तर आभार प्रदर्शन प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी लता माळोदे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी कैलास लोखंडे यांचे मार्गदर्शनात सर्व केंद्रप्रमुख, शिक्षक यांनी परिश्रम घेतलेत.