कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:- तालुक्यातील कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत रायनगर येथे विकास शाळे जवळील झाडे झुडपातच्या आड २५ ते ३० बोरी अवैध दगळी कोळसाचा साठा मिळुन आल्याने वेकोलि सुरक्षा अधिकारी रविकात कंडे व कन्हान पोलीसांचे डि.बीपथकाने धाड मारून संयुक्त कारवाई दरम्यान दोन आरोपीला ताब्यात घेतले.
त्याचा जवळुन 25 ते ३० ० बोरी ३ क्विटल ४४० किलो दगळी कोळसा किमत २० हजार ६४० रुपये आणि मारोती व्हॅन वाहना किमत 30 हजार रुपये सह असे एकुण ५०,६४० रुपयांच्या मुद्देमाल जप्त केले व कन्हान पोस्टेला दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार गुरुवार दिनांक गुरुवार ९ फेब्रुवारी ला वेकोलि सुरक्षा अधिकारी रविकांत कंडे आणि कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर , सहायक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम , हेड कांस्टेबल मुदस्सर जमाल , हरिष सोनबद्रे , महेन्द जळीतकर, प्रविण चौहान,वैभव बोरपल्ले , सम्राट वनपर्ती , सह डि बी पथकाचे पोलिस कर्मचारी हे परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि रामनगर येथिल विकास शाळे जवळ दोन ईसमांनी मारोती व्हॅन क्रमांक एम एच ३१ सी एन ७०४१ मध्ये ३.४४० किला अवैध दगळी कोळसाचा साठा भरला असल्याचे दिसून आले असल्याचे माहिती वरुन वेकोली सुरक्षा अधिकारी रविकांत कंडे आणि कन्हान पोलीसांचे डि बी पथकाचे पोलिसांनी घटनास्थळी पोहचले.
त्या ठिकाणी दोन इसम आणि मारोती व्हॅन क्रमांक एम एच ३१ सी एन ७०४१ दिसुन आल्याने रविकांत कंडे आणि पोलीसांनी दोन कोळशा चोर १) देवनाथ प्रकाश वाडीभस्मे , २) सुरेश लिल्हारे दोन्ही राहणार कांद्री यांना ताब्यात घेतले.
पोलीसांनी मारोती व्हॅन क्रमांक एम.एच.३१,सी.एन. ७०४१ वाहनाची पाहणी केली असता वाहनात २५ ते ३० कोळस्याचे बोरे आढळुन आले. सुरक्षा अधिकारी रविकांत कंडे यांनी सदर कोळसा ओसीएम वजन काट्यावर नेऊन वजन केले असता ३ हजार ४४० किलो भरला.
सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीस स्टेशनला तक्रारदार सुरक्षा अधिकारी रविकांत कडे याची तक्रारी वरून अपराध क्रमाक ६२/२३ अन्वये कलम ३७९ भादवी नुसार गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपीला अटक केली.