
सैय्यद ज़ाकिर
जिल्हा प्रतिनिधी वर्धा…
वर्धा :- सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय वर्धा आणि जलजिविका पुणे यांचा सयुक्त विद्यमाने समाज कल्याण सभा गृह वर्धा येथे मत्स्य व्यवसाय वृद्धि साठी मत्स्य शेतकरी आणि मच्छीमारांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्य शाळेत ऐकुण 130 पेक्षा अधिक लाभार्थी व मत्स्य व्यवसायिक उपस्थित होते..
नागपुर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय नागपुर श्री.सुनील जांभुळे यांनी उपस्थित राहुन प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने विषयी विस्तृत माहिती देऊन मासे विक्री योग्य झाल्या नंतर मासे काढनी,मासे हाताळनी आणि मासे वाहतुक विपणन या बाबत मार्गदर्शन केले.
वर्धा जिल्ह्याचे सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय श्री. स्वपनील वालदे यांनी सर्व उपस्थितांचे शब्द सुमनांनी स्वागत केले व मत्स्य व्यवसाय वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत सांगितले.
जलजिविका संस्थेचे सलागार श्री.समीर परवेज़ यानी मत्स्य व्यवसाय क्षेत्रात बाजार पेठ,सोई-सुविधा,मत्स्य उत्पादकांच्या अळीअळचनी व त्यावरील तोडगा या विष्यावर मार्गदर्शन केले.
एक्वा ई मित्र चाट बाट आँनलाईन प्लेटफॉर्म उद्घाटन करण्यात आले.यात मत्स्य व्यवसाय विषयी सर्व माहिती उपलब्ध आहे.
कार्यशाळेमध्ये वर्धा जिल्ह्यातील प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे लाभार्थी श्री.मयंक सिंग,मुख्यकार्यकारी अधिकारी एम.एस.डी.एक्वा कल्चर मार्या.नागपुर यांनी पिंजरा पध्तीने मत्स्य स्वर्धंन प्रकल्पामध्ये चांगले मत्स्य उत्पादन घेतल्यामुळे त्यांचा सम्मान चिन्ह देवुन स्वागत करण्यात आले…
कार्यशाळांमध्ये मत्स्य व्यवसाय विभागा मार्फत श्री. स्वप्नील वालदे,श्री.दी.रा.खोबे,स.म.वी.अ.वर्धा,बैंक ऑफ इंडियाचे जिल्हा व्यवस्थापक,श्रीचेतन शीरभाते,नाबार्ड मार्फत श्री.सुशांत पाटिल,श्री.मारबड़े अध्यक्ष जिल्हा मच्छीमार सहकारी संघ मार्या वर्धा,जलजिविका संस्थेचें सल्लगार समीर परवेज़,गणेश तुदसकर,दामिनी अखंड,रीमा तवाडे,ब्रिजेश बरवा व आरती पुसदकर,आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे लाभार्थी,महिला बचत गटाचा महिला,मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थाचे पदाधिकारी आदि उपस्थित होते.