आरमोरीत एकशे पाच रक्त दात्यांनी केले रक्त दान… — स्व – स्वरूप संप्रदायचा उपक्रम…

ऋषी सहारे 

  संपादक

आरमोरी :- अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पिठ नाणीज धाम, रक्तदान महायज्ञ, आरमोरी स्वस्वरूप संप्रदाय आरमोरी जि.गडचिरोली तर्फे स्थळ उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे दि 11/01/2025 ला रक्तदान शिबिर आयोजीत केला होता. त्यात एकशे पाच रक्त दात्यांनी रक्तदान केले.

           आरमोरी रक्तदान शिबीरास डॉक्टर अमोल धात्रक, वैधकीय अधिकारी ता.आरमोरी, प्रताप लोहबरे पिएसआय आरमोरी, आशीष निमजे सचीव कृषी बाजार समीती अरमोरी हजर होते.

          सदर शिबीरास विजय गडपायले जिल्हा निरिक्षक, सौ.कविता चिळगे माजी महिला जिल्हा अध्यक्ष, कृष्णा खरकाटे, अतुल धात्रक जिल्हा सचिव, वैशाली तितिरमारे, वृंदा दहिकर तालुका महिला प्रमुख, राम तामसटवार तालुका अध्यक्ष आरमोरी, श्रीकांत सेलोटे, हरिभाऊ कामथे श्रीधर कांबळे व इतर तालुका गुरुबंधू , भगिनी उपस्थित होते.

          जगत गुरू नरेंद्राचार्य महाराज नाणिज धाम मुख्य पीठ जिल्हा रत्नागिरी ( महाराष्ट्र) अंतर्गत राज्यात एक लाख बाटल स्व- स्वरूप संप्रदायचे वतीने महारक्त दान देण्याचा संकल्प केल्याचा म्हटले आहे.