
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकृत करून दिनांक 26 जानेवारी 2019 पासून संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली.
संविधानाचे महत्त्व अनेक स्तरावर असून भारतीय संविधानात समाजवादी धर्मनिरपेक्षक लोकशाही गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक आर्थिक व राजनीतिक न्याय विचार अभिव्यक्त विश्वास श्रद्धा यांचे स्वातंत्र्य तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता बंधुता या मुलांचा विचार केला आहे.
संविधान हे एक जिवंत दस्तवेच आहे,जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
अशा या भारतीय संविधानात सन 2024-25 यावर्षी 75 वर्ष पूर्ण झालेल्या निमित्त शासनामार्फत या अमृत महोत्सवी वर्षात,”हर घर संविधान,हा उपक्रम साजरा करण्यात येत आहे.
संविधान अमृत महोत्सव 2024-25 हर घर संविधान अंतर्गत शासनामार्फत विविध संस्थे मध्ये वेगवेगळे उपक्रम राबविण्याबाबत सूचित करण्यात आले होते.त्यामध्ये पटनाट्य सादर करणे,निबंध लेखन स्पर्धा घेणे,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे,नाटक, देशभक्तीपर गीत इत्यादींचा समावेश होता.
संविधान अमृत महोत्सव 2024 – 25,”हर घर संविधान,अंतर्गत शासनामार्फत विविध संस्थे मध्ये वेगवेगळे उपक्रम राबविण्याबाबत सूचित करण्यात आले होते.
यानुसार स्थानिक नगरपरिषद भद्रावतीने शहरातील विद्यार्थ्याकरिता विविध वयोगटांनुसार भारतीय संविधान व भारतीय राज्यसंस्था या विषयास धरून वर्ग आठ ते दहा व वर्ग 11 ते 12 करिता प्रश्नमंजुषा स्पर्धा स्थानिक लोकमान्य विद्यालय भद्रावती येथे दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी दोन सत्रात आयोजित केलेली होती.
सोबतच शासनाचे स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान यास अनुसरून वयोगट वर्ग चार ते सात या विद्यार्थ्यांकरिता स्वच्छ भारत व माझी वसुंधरा या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केलेली होती.
सदर स्पर्धेचे दोन्ही सत्र मिळून एकूण 823 विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला शहरातील एकूण तेरा शाळा व महाविद्यालयांनी सदर स्पर्धेमध्ये आपल्या विद्यार्थ्यामार्फत सहभाग नोंदविला.
सदर स्पर्धा आयोजनाकरिता स्थानिक नगर परिषद भद्रावती चे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेळकी यांचे नेतृत्वाखाली संपूर्ण नगरपरिषद कर्मचारीचे चमूनी मेहनत घेतली.