केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्या विरोधात जिल्हा सत्र न्यायालयात फौजदारी खटला दाखल… — २० जानेवारीला सुनावणी…

प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक 

      केंद्रीय गृहमंत्री श्री.अमीत शहा यांच्या विरुद्ध,मा.स्पेशल कोर्ट,विशेष जिल्हा व सत्र न्यायमूर्ती वरोरा यांच्या न्यायालयात,अट्रासिटीचा कलम १४(१) व ४ तसेच भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ व इन्फारमेशन टेक्नॉलॉजी कलम ६४ नुसार फौजदारी खटला दाखल झाला आहे.

        फौजदारी खटला क्रमांक ०२/२०२५ असुन सुनावणी दिनांक २०/०१/२०२५ ला ठेवन्यात आली आहे.

        महत्त्वपूर्ण पदावर असलेले केंद्रीय गृहमंत्री श्री‌.अमीत शहा यांच्या विरुद्ध अट्रासिटीचा कलमानुसार फौजदारी खटला दाखल होने ही भारतातील पहिलीच केस आहे.

       फिर्यादी संघर्षी आयु.विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी तथा जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी आणि भारतीय संविधानाचे अभ्यासक यांनी फौजदारी पीटिशन दाखल केली आहे.

       सविस्तर असे आहे की,आरोपी केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार ना.श्री.अमीत शहा यांच्यासह,जिल्हादंडाधिकारी चंद्रपूर श्री.विनय गौडा जी.सी. IAS अधिकारी,पोलिस अधीक्षक श्री.मुमक्का सुदर्शन IPS अधिकारी चंद्रपूर,उपविभागीय पोलिस अधिकारी वरोरा कु.नयोमी दशरथ साठम मॅडम वरोरा IPS अधिकारी व ठाणेदार श्री.अजिक्यं तांमडे वरोरा PI यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे अट्रासिटीचा कलम ४ नुसार व इन्फारमेशन टेक्नॉलॉजी कायदा कलम ६४ नुसार,आणि भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चा कलम ६१(२),१९९,२९८,३१६(५),३१८(१), ३३५,३३६(३),३४०(१),३४०(२),व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अधिनियम २०२३ चे कलम १९९,१७५(३),१७३(४)(ख) नुसार फौजदारी कारवाई साठी विशेष जिल्हा व सत्र न्यायालय वरोरा यांच्या न्यायालयात फौजदारी पीटिशन दाखल केली आहे.सदर फौजदारी पिटिशन अन्वये दिनांक २०/०१/२०२५ ला सुनावणी आहे.

      फौजदारी पिटिशन दाखल करणारे फिर्यादी संघर्षी आयु.विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी हे जबाबदार व जागृत नागरिक आहेत तथा कायद्याचे विद्यार्थी असून भारतीय संविधानाचे अभ्यासक सुध्दा आहेत.तद्वतच ते सामाजिक कार्यकर्ता तथा RTI कार्यकर्ता आहेत.

            या देशातील मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की आपल्या देशात कायद्याचे राज्य अर्थात भारतीय संविधानाचे राज्य आहे,मनमानीचे नाही..या देशात कायद्यापुढे कुणीही मोठा नाही…

       सरकार कडून पगार घेणारे जे कुणी व्यक्ती आहेत,ते सर्व लोकसेवक आहेत,म्हणजे जनतेचे सेवक आहेत.

        कायद्याचा बाहेर जाऊन नियमबाह्य व बेकायदेशीर कामे करणे,किंवा एखाद्या महापुरुषांच्या अवमान होईल असे अपशब्द वारंवार बोलून अवमान करणे व ते इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करणे आणि समाज बांधवांचा भावना दुखावणे हा “दखलपात्र” गुन्हा आहे.

           केंद्रीय गृहमंत्री श्री.अमीत शहा यांनी दिनांक १८/१२/२०२४ रोजी कायदेपंडित ज्ञानाचे प्रतीक विश्वरत्न,भारतरत्न,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत अनुचित शब्द उच्चारुन राज्यसभेत अपमान केला.

         याचबरोबर करोडो करोडो पीडित,वंचित,शोषित, दलित,यांचे दैवत असलेल्या महापुरुषांच्या बदल केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी एकेरी शब्दांचा उच्चार करीत,”आंबेडकर – आंबेडकर – आंबेडकर – आंबेडकर – आंबेडकर – आंबेडकर हे फॅशन झाले आहे,इतका वेळ देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता,असे बेताल वक्तव्य संसद भवन मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बोलले.

         पीटिशन अधिकारी यांच्या समक्ष हातवारे करून बोलत असताना त्यांच्या पक्षाचे खासदार हसत होते व हे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये लाइव्ह वायरल झाले व करोडो करोडो समाज बांधवांचा भावना दुखावल्या गेल्या,हा गुन्हा केंद्रीय गृहमंत्री श्री.अमीत शहा यांनी केला आहे.

           केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात,भारतात आंदोलने केली,मोर्चे काढलीत,निषेध नोंदविला,निवेदन दिलेत आणि कारवाईची मागणी केली.परंतू जेव्हा कुठेच कारवाई झाली नाही तेव्हा विनोदकुमार खोब्रागडे यांनी विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली आणि फौजदारी पीटिशन दाखल केली.

         इतके सारे होऊनही केंद्रीय गृहमंत्री श्री.अमीत शहा यांनी सभागृहात माफी मागितली नाही,जे लिखीत नव्हते.कितेक वर्षांपासून त्यांच्या पोटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आकसभाव होते तेच त्यांच्या ओठावर आले,ते जाणीवपुर्वक बोलले आहेत असे विनोदकुमार खोब्रागडे याचे म्हणणे आहे.

           पोलिस प्रशासन व जिल्हादंडाधिकारी यांना गंभीर रिपोर्ट देऊनही त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही व आपल्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांना ही सह आरोपी त्यांनी केले आहे.

          भारत सरकारचे केंद्रीय गृहमंत्री ना.श्री.अमीत शहा यांच्या सह,जिल्हादंडाधिकारी चंद्रपूर,पोलिस अधीक्षक चंद्रपूर,उपविभागीय पोलिस अधिकारी वरोरा व ठाणेदार वरोरा यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे अट्रासिटीचे कलम ४ नुसार व भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चा कलमानुसार तसेच ईन्फारमेशन टेक्नॉलॉजी कलम ६४ नुसार कारवाई साठी वरोरा विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात फौजदारी पीटिशन दाखल केली आहे.

      केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार श्री.अमीत शहा यांच्या निर्देशानुसार,रिपोर्ट दिल्यानंतर तीन दिवसांत पोलिस प्रशासनानी अँक्शन घ्यावी,पण त्यांच्या निर्देशाला पोलिस प्रशासन मानत नाही असे दिसून येते आहे.

        तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार श्री.सुशीलकुमार शिंदे यांनी आदेश दिले की तक्रार दिल्यानंतर पोलिस प्रशासन यांनी कारवाई केली नाही तर पोलिस प्रशासन यांचावर फौजदारी कारवाई करावी असे निर्देश दिले होते.

        सुप्रीम न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणतात,तक्रार देऊन सात दिवसांत पोलिस प्रशासन यांनी कारवाई केली नाही तर पोलिस प्रशासन यांच्यावर गुन्हा दाखल करावे.

        हे सर्व पुरावे घेऊन,प्रथम पोलिस प्रशासन यांना केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार श्री.अमीत शहा यांच्या विरुद्ध रिपोर्ट दिली,तीन दिवस होऊनही कारवाई केली नाही.

       नंतर जिल्हादंडाधिकारी चंद्रपूर यांचाकडे रिपोर्ट केली त्यांनी सुद्धा निर्देश व कारवाई केली नाही..

        यामुळे अखेर जिल्हा व सत्र न्यायालय वरोरा येथे फौजदारी खटला विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे यांनी संबंधितांच्या विरोधात दाखल केलाय.

*****

टिप:- वरिल प्रेस नोट जशीच्या तशी फारवड करु शकता,मात्र तोडफोड करुन,आपल्या जवळचे शब्द वापरून वायरल करु नका,व चुकीचा मॅसेज समाजात वायरल करु नका.

     राज्य नियमावली,भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अधिनियम २०२३ कलम ३० पहा.चंद्रपूर जिल्हा अंतर्गत बाब आहे.

*****

जनहितार्थ जारी…

          समाजहितासाठी, देशहितासाठी, राष्ट्रबांधनीसाठी, लोकशाही बळकट करण्यासाठी,संविधान संरक्षणासाठी सर्व नागरिकांनी जागृत राहावे धन्यवाद!..

      या प्रकरणात संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील,महाराष्ट्रातील, भारतातील,जनतेचे लक्ष लागलेले आहे….

   आ.विनोदकुमार खोब्रागडे… 

 संपर्क क्रमांक…

९८५०३८२४२६…

८३२९४२३२६१….