
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमी श्रीक्षेत्र गोंदेडा येथे १३ जानेवारीला गोपाळकाला असल्याने यात्रा भरत असते या यात्रा महोत्सवामध्ये दुकान लावण्यासाठी ग्राम पंचायतीने जागेचा जाहीर लिलाव केला.
लिलाव गावातील युवकांनी घेतला आणि यावर्षी दुकानदारांना त्रास होवू नये म्हणून १०×१० चे प्लाट पाडलेले आहेत.आणि जे दुकानदार बंधु आधी येणार त्यांच्या सोयी नुसार पावती फाडून जागा बुक करणे सुरू आहे.
गुंफा यात्रा महोत्सवाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने दुकानासाठी योग्य नियोजन करून प्लाट देणे सुरू आहे तरी दुकानदारांनी यात्रेत दुकान लावण्यासाठी दोन दिवसांआधी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.