प्रितम जनबंधु
संपादक
भारत सरकारने नुकताच पारित केलेला हिट अँड रन हा कायदा दुचाकी ( मोटारसायकल), तीनचाकी (ऑटोरिक्षा), चारचाकी हलके वाहन आणि जड वाहन या सर्वांसाठी सारख्याच प्रमाणात लागू होणार असून यातून वरील प्रकारातील कोणत्याही प्रकारच्या वाहन चालकांची सुटका नाही. ह्याच्या हातून नकळत अपराध घडला तरी यांच्यावर दहा वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपये दंडाची सजा होणार आहे. म्हणून या हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ सर्वच प्रकारच्या वाहन चालकांनी एकजुटीने सहभागी होऊन काळा कायदा वापस घेण्यासाठी संवैधानिक पद्धतीने आणखी तीव्र आंदोलन केले पाहिजे.
या कायद्याच्या विरोधात आंदोलन तीव्र करण्याचा एक भाग म्हणून अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या माध्यमातून ट्रान्सपोर्टनगर, अम्बुजा फाटा, हरदोना त राजुरा जि. चंद्रपूर येथे अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरजभाऊ उपरे, हरदोना, यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे महासचिव कमलेश राऊत, चंद्रपूर, जिल्हा संघटक अनंताभाऊ रामटेके, चंद्रपूर, महाराष्ट्र सल्लागार अशोककुमार उमरे गडचांदूर, कोषाध्यक्ष अनिल चिरमुले हरदोना, हनुमान रामुलवार देवाडा पोभुर्णा, सुरज प्रतापसिंग चाल म्हाडा कॉलनी चंद्रपूर, बाळू रामटेके यशवंतनगर पडोली, सुंदर कस्तुरवार आमटा वार्ड पडोली, संतोष वाघमारे, आंबेडकर नगर बाबुपेठ चंद्रपूर इत्यादींनी एक दिवसीय धरणा आंदोलन केले.
धरणा आंदोलनाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांच्या समर्थनार्थ सुनील गोमलवार, रामराव राठोड, बोनेकृष्ण, किसन साळवे, अब्दुल नेहाब, हवकेश प्रसाद, मुस्ताक आलम, केदार यादव, सिताराम जाधव, अजय यादव, विजय नगराळे, विजय ढुमणे, शिवाजी कदम, श्रीराम गायकवाड, राकेशकुमार कुशवाह, बालाजी ढोकणे, विक्रम राजभर, सियाराम प्रजापती, गजाधर यादव, गुरूचरण, चंद्रप्रकाश, देवानंद मोहिते, शिवशंकर, रोशन वर्मा, सुरेंद्र यादव, गुरूदीप सिंह, चुबेरसिंह, जसवीरसिंह, संदीप नवले, सेमास कवठे, प्रतिन पात्रो, संदीप कुबडे, पंडित आत्राम इत्यादी वाहन चालक कामगारांनी आंदोलनकर्त्यांसोबत बैठे आंदोलन करून धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला.