मागच्या लेखात मांडणी केल्याप्रमाणे कुटनीतीची ( साम, दाम, दंड आणि भेदावर आधारलेली ) निर्मिती ही बाहेरून आलेल्या आर्यानी केली, आणि तीची जगभर पेरणी केली. परंतू , बोटावर मोजण्याइतक्या महापुरुषांनी तीला जगाच्या वेशिवर टांगण्याचा त्या त्या काळात यशस्वी प्रयत्न केला…..
परंतू ,अधून मधून संधी मिळताच तीने आपले डोके वर काढण्याचा प्रयत्न केला. परंतू , त्या त्या काळात त्या त्या महापुरुषांच्या अनुयायांनी घरावर तुळशीपत्रे ठेऊन, प्रसंगी रस्त्यावर उतरून, जीवाचे बलिदान देऊन, या कुटनीतीच्या कृतीला हाणून पाडण्याचे काम केले….
परंतू ,गेल्या 30 वर्षात कुटनीतीची जोमाने वाढलेली शक्ती, तीची खोलवर रुजलेली मुळे, आमच्यातील संघटना ( छोट्या मोठ्या ) क्षनैक मोहाला बळी पडण्याची परंपरा, विशेष म्हणजे आमच्या संघटनाचा आणि समाजातील सर्वसामान्य जनतेचा या अशा प्रवाहातून एक समज निर्माण झाला की, गेल्या 30 वर्षात ज्या काही संघटना निर्माण झाल्या, जे काही गल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष निर्माण झाले, जे काही महापुरुषांच्या जयंत्या आणि स्मृतिदिनानिमित्त (केवळ त्याच दिवशी ) वेगवेगळे कार्यक्रम घेऊन त्यांना अभिवादन करण्याच्या परंपरा फोफावल्या……
त्या केवळ समाजाकडून पॆसे गोळा करून स्वार्थ साधने यापलीकडे कधी जाऊच शकल्या नाहीत ( कदाचित याला अपवाद असू शकतो ). असा ढोबळ मानाने अर्थ निघतो.
याचा परिणाम असा झाला की संविधानवादी, मानवतावादी विचारसरणी ही आपोआपच स्वतःहून गेल्या 30 वर्षात स्वतःहून कोलमडून पडली. यासाठी कुटनीतीला जास्त कष्ट करावे लागले नाहीत. म्हणून पूर्वी सुरुवातीच्या काळात समाज गरीब होता, परंतू चळवळी समाजाच्या दाणी वृत्तीतून, त्यागातून, श्रीमंत झाल्या. (म्हणूनच तर दलित पँथरच्या माध्यमातून नामांतराची चळवळ, शहीदांच्या क्रांतीने यशस्वी झाली ), परंतू , आज मात्र समाज श्रीमंत झाला आणि चळवळी गरीब झाल्या….!
याचे कारण हेच की कुटनीतीची घुसखोरी सर्वच क्षेत्रात झालेली आहे. त्या कूटनितीला चांगले ठाऊक आहे, की, आपल्याला केवळ……..
” आंबेडकरवादच “
शह देऊ शकतो, म्हणून त्या आंबेडकरवादालाच संपवलं तर, म्हणून त्यांनी दलित पँथरला संपविण्यासाठी मराठवाडा विद्यापिठाचा नामविस्तारच करून टाकून चळवळी मोडीत काढण्यास सुरुवात केली आणि तेंव्हापासून आमच्या चळवळीचे रूपांतर गल्ली गल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष निर्माण होण्यात झाले…..!
आमचे लढवय्ये जवान नेते होऊन त्यांच्या घरातच कुटनीतीने शिरकाव केल्यामुळेच वाघाचे रूपांतर राजकारणात केवळ निवडणुकीपुरतेच समाजाचा Use &Throw वापर करून घेणाऱ्या कोल्ह्यात झाले….!
परिणामी अशा गोंधळलेल्या सामाजिक वातावरणात जर कुणी आज ( 2024 च्या काळात ) कुणी एखादी व्यक्ती किंवा व्यक्ती समूह कोणत्याही संघटनाशिवाय, कोणत्याही पक्षाशिवाय स्वार्थाला त्यागून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त. भगवान बुद्धाच्या आणि इतर जगातील वंचित उपेक्षित तत्ववेत्त्यांच्या, महापुरुषांच्या क्रांतीला, समजून घेऊन, तन, मन आणि धनाने योगदान देऊन ठाम खडकाप्रमाणे उभा टाकतो, तेंव्हा अशा गढूळ वातावरणामुळे समाज त्यावर विश्वास ठेवत नाही. आणि तो मेल्यावर तोच हळहळ करण्यात सर्वात पुढे असतो…….!
म्हणून गेल्या 30 वर्षात आपल्या संविधानवादी, मानवतावादी चळवळी संपन्याचे हे एक मुख्य कारण आहे…..!
परंतू,काहीही झाले तरी आपल्याला गेल्या 30 वर्षाची उणीव भरून काढणे अत्यंत आवश्यक आहे……
अनेकांचा एक समज आहे की, भारत देशात कोणतीही क्रांती होऊ शकत नाही, क्रांत्या फक्त फ्रेंच, अमेरिकन, रशियन, जपान इत्यादी देशातच होऊ शकतात. परंतू , इथे भीमक्रांती झाली हे कूटनितीचे लोक विसरतात. आता आपल्याला ( संविधानवादी, मानवतावादी विचारसरणी मानणाऱ्यांना ) याच भीमक्रांतीला पुढे नेणे हे प्रत्येक बाबासाहेबाच्या लेकराचे नैतिक कर्तव्य आहे…..
कधी नव्हे ते सुप्रीम कोर्टाचा वकील संघ EVM +VVPAT च्या विरोधात रस्त्यावर उतरतो, तुरुंगात जायला घाबरत नाही. आणि बाबासाहेबांचा समाज घरात बसून चालेल का….?
आम्हाला सुद्धा या वकिलांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून शेवटचा लढा लढवायचा आहे…..!
ही संधी हुकली की मनुस्मृतीची गुलामीच हळूहळू आपल्या वाट्याला आलीच म्हणून समजा, तेंव्हा आपले मरण आपल्याच उघड्या डोळ्यांनी बघावे लागेल…..!
समाजात पूर्वीची चेतना आहे किंवा नाही, का मनुवाद्याच्या गळाला सहजा सहजी लागतो का, हे तपासण्यासाठी गेल्या 15 दिवसापूर्वी 130 व्हाट्सअप ग्रुपवर मी आवाहन केले होते की, मला YES मेसेज पाठवा, संपूर्ण महाराष्ट्रातून 72 मेसेज आले, त्यानंतर रविवारी 5000 /- रुपयाचे आवाहन केले आणि 10 /01 /2024 पर्यंतचे आव्हान त्यात केले. अजून तरी कुणी 5000/- रुपये टाकले नाहीत, उद्याचा दिवस वाट पाहूया…..
11 तारखेला समजेल की आमचा समाज झोपलेला आहे की सोंग घेतलेला आहे. कारण रविवारची आव्हानात्मक पोस्ट मी पारदर्शक टाकलेली होती. कारण दूरदृष्टीने जे विचार करतात त्यांनाच तळमळ असते मग ते कुणीही असोत….
आपण उद्यापर्यंतचे आवाहन पेलू शकलो तर निदान महाराष्ट्रात तरी EVM+ VVPAT च्या विरोधात रस्त्यावर उतरून जनजागृती करू शकतो आणि निवडणूक आयोगाला भाग पाडू शकतो. कारण हा लढा जनतेचा आहे कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही….
आणि जनतेमध्ये आंबेडकरवादिच पुढे असतात म्हणून हे आव्हान तुम्हाला आहे.
जोपर्यंत पॆसे जमा होत नाहीत,तोपर्यंत,बघून ठेवलेली गाडी बॅनर लावून सजवता येत नाही,पत्रके छापायला, आव्हानात्मक पुस्तिका छापायला, पोलीस महासंचालकांना परवानगी काढायला, प्रथम पॆसे आणि वेळ लागतो. आणि आपण यामध्येच जास्त वेळ गेला आणि आचारसंहिता फेब्रुवारीच्या शेवटच्या, मार्चच्या पहिल्या आठवड्यात जार लागली तर त्यावेळी लाखो रुपये जमा करून काहीही उपयोग होणार नाही……!
आणि ही शेवटची संधी आहे. यानंतर पुन्हा संधीच नाही.
म्हणून पुन्हा एकदा सर्वांना सूचनावजा विनंती आहे की आपण या लढ्यात तन, मन आणि धनाचे योगदान देऊन समर्पित व्हावे….
अन्यथा आपल्याला प्रत्येकाला घटनेने स्वातंत्र्य दिलेलेच आहे. ते कुणीही हिरावून घेऊ शकत नाही…
कारण
NO FORCE NO REQUEST ONLY INFOMATION
या तत्वावर आधारित ही पोस्ट आहे…….
माझा फोनपे नंबर :- 7875452689 अनंत केरबा भवरे
आवाहनकर्ता..
अनंत केरबाजी भवरे
( संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689 )