नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली -राज्य परिवहन महामंडळाच्या साकोली आगारामध्ये आज दिनांक 11/01/2023 रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुरक्षितता अभियान या राज्य परिवहन कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत जनजागृतीचा मोहिमेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गौतम शेंडे आगार व्यवस्थापक साकोली हे तर उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून श्री जितेंद्र बोरकर, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे साकोली हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हेमकृष्ण कापगते माजी आमदार साकोली क्षेत्र तथा मानसेवी वैद्यकीय अधिकारी, राज्य परिवहन साकोली आगार, डॉ. राकेश नंदेश्वर, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती साकोली, कृष्णकुमार नैतामे आरोग्य पर्यवेक्षक, पंचायत समिती साकोली, अमोल उईके, विभागीय लेखाकार, भंडारा आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ माधुरी मेहर, सहाय्यक वाहतूक अधीक्षक साकोली आगार यांनी तर संचालन शंकरराव पर्वते वाहतूक नियंत्रक यांनी व आभार प्रदर्शन गणेश वाघमारे, आगार लेखाकार यांनी केले.
सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने चालक वाहक यांत्रिकी वर्ग तथा प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.