अश्विन बोदेले
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
देऊळगाव: आरमोरी तालुका स्थळापासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या देऊळगाव येथे दिनांक 05 जानेवारी 2023 रोजी पासुन भव्य टेनिस बॉल हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये विजेत्या संघांना बक्षीस वितरण करण्यात आले.
या बक्षीस वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी , डॉ. पंकज हेमके वैद्यकीय अधिकारी देऊळगाव , तर प्रमुख अतिथी एपीआय धर्मेंद्र मडावी साहेब हे होते.
मुख्य उस्थितीमध्ये किशोर आत्राम, कवजित आलम, अनिल कवडो, अंकुश राऊत, विलास सृंगारे, सुधीर चौखे, सचिन उसेंडी, देवा गडपल्लिवर , जगदीश आऊतकर, कमांडो ट्रेनिंग सेंटर गडचिरोली ( कॅम्प डोंगरसावंगी) हे होते.
या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक फ्रेंड्स क्लब वडसा , तर द्वितीय क्रमांक युवा क्लब देऊळगाव, तर तृतीय क्रमांक कांडेश्वर क्लब देऊळगाव यांनीअनुक्रमे प्रथम बक्षीस 30000 द्वितीय बक्षीस 20000 आणि तृतीय बक्षीस 10000 रुपयांचे पारितोषिक मिळविले.
सदर बक्षीस वितरण डॉ. पंकज हेमके वैद्यकीय अधिकारी देऊळगाव, आणि एपीआय धर्मेंद्र मडावी साहेब यांच्या हस्ते विजेत्या संघांना प्रदान करण्यात आले.
यावेळी क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या मार्गदर्शनात मान्यवरांनी सांगितले की, खेळाबरोबरच आपले आरोग्य आणि सामाजिक सलोखा अबाधित ठेवून , योग्य तो समन्वय घडवून आणावा असे आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
सदर स्पर्धा दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी संपन्न झाल्याने बक्षीस वितरण सोहळा सीटीसी गडचिरोली (कॅम्प डोंगर सावंगी) येथील पोलीस अधिकारी/ प्रशिक्षक व ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडले.
या कार्यक्रमाचे संचालन धीरज हाडगे तर आभार प्रदर्शन मनोज बिसेन यांनी केले.