निरा नरसिंहपुर दिनांक 10
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,
मॉडलिंग फिल्म्स अँड डान्स फेडरेशन सिजन ११ या शोमध्ये इंदापूरची पियूषा लांडगे हिने मिस एशियाचा किताब पटकावला आहे. राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दूधगंगा येथे पियूषा लांडगे हिचा सन्मान करून तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
एमएफडीएफ ही अभिनय, मॉडेलिंग आणि नृत्याचे प्रशिक्षण देणारी भारतातील अग्रगण्य फॅशन इव्हेंट कंपनी असून, या कंपनी-ने ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर २५डिसेंबर रोजी मुंबई येथे या स्पर्धेचे आयोजन केले होते. एकाचवेळी पार पडलेल्या मिस्टर, मिस आणि मिसेस एशियाच्या स्पर्धेत भारतातील अनेक प्रतिभावंत स्पर्धकांनी भाग घेतला होता.पियुशा लांडगे ही या स्पर्धेत मिस एशियाची मानकरी ठरली.
यावेळी पियूषा चे आई-वडील, इंदापूर नगरपरिषदेची गटनेते कैलास कदम, भारतीय जनता पार्टी इंदापूर शहर अध्यक्ष शकीलभाई सय्यद उपस्थित होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधत तिच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.