फटाक्यांची आतिषबाजी व शिरीजची झगमगाट रोषणाई…

— देशात खरबो रुपयांच्या फटाक्यांची आतषबाजी झाली असल्याचा अंदाज!..

— भाऊबीज तर संबंधाला दृढ करतोय..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

वृत्त संपादीका

काल रात्रो ७ ते १० वाजताच्या दरम्यान फटाक्यांच्या आतिषबाजीने चंद्रपूर व नागपूर शहराला दणाणून सोडले.

रात्रो ७ वाजताच्या सुमारास सुरू झालेली फटाक्यांची आतषबाजी रात्रो १० वाजता पर्यंत सातत्याने सुरू होती.वेगवेगळ्या आवाजातील साध्या फटाक्याची व सुतळी फटाक्यांची आतिषबाजी बघून फटाके फोडणेवाल्यांनी जणूकाही एकमेकांशी शर्यत लावली होती काय? असे दृश्य बघायला मिळाले.

दिवाळीच्या निमित्ताने चार ते पाच दिवस विविध प्रकारचे फटाके फोडल्या जातात.यामुळे देशांतर्गत फटाके खरेदी-विक्रीचा आर्थिक व्यवहार हा खरबो रुपयांच्या घरात असल्याचे दिसून येते.

मात्र,एवढ्या मोठ्या प्रमाणात फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांनी खरोखरच दिवाळी उत्सव आनंदाने साजरा केला जातो काय?हा अंतर्मुख करणारा प्रश्न आहे.

दिवाळी निमित्ताने घरांवर शिरीजची झगमगाट रोषणाई खरोखरच लक्षवेधक आणि आकर्षक असते.तद्वतच घरावरील रोषणाई दिपोत्सवाचा महत्वपूर्ण भाग असल्याचे लक्षात येते‌.

अनेकांच्या घरी आपापल्या परीस्थिती नुसार विविध प्रकारचे व आवडीचे पकवान करून दिवाळीचा आनंद द्विगुणित केला जातो.

याचबरोबर भाऊबीज अंतर्गत भावाच्या ओवाळणी निमित्ताने तर एकमेकांच्या भेटीगाठी होतात.भाऊबहिण नात्याचे संबंध दृढ केली जातात व या नात्यान्वये एकमेकांप्रती मैत्रीभाव जपण्याची परंपरा कायम राखली जाते हे महत्त्वाचे.