ईव्हीएम मशीन विरोधात बिआरएसपीचे धरणे आंदोलन होणार आज… — राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सुरेश माने करणार आंदोलनाचे नेतृत्व..

प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक 

        ईव्हीएम मशीन द्वारे होणाऱ्या निवडणुका या पारदर्शक,निष्पक्ष,विश्वसनीय, निसंदेह,स्वतंत्रपणे खुल्या वातावरणात होत नसल्याने,”ईव्हीएम मशीन हटाव,विरोधात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी द्वारे आज धरणे आंदोलन,”कळमेश्वर रेल्वे स्टेशन जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,येथे होणार आहे.

    (जिल्हा नागपूर येथे होणार आहे.)

           सार्वत्रिक निवडणुका दरम्यान ईव्हीएम मशीन मध्ये छेडछाड करुन मते फेरफार केली जातात आणि निवडणूका जिंकल्या जातात असा विश्वास भारत देशातील मतदारांना आता झालेला आहे.

      आणि म्हणूनच ईव्हीएम मशीन विरोधात,”बिआरएसपीचे धरणे आंदोलन राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सुरेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात,नागपूर जिल्हातंर्गत कळमेश्वर रेल्वे स्टेशन जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आज पार पडणार आहे.

        “ईव्हीएम,-निवडणुकीत रुपयांचा पाऊस आणि निवडणूक आयोगाची निष्क्रियता,या विषयावर राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सुरेश माने मनोगत व्यक्त करणार आहेत.

        धरणे आंदोलनाचा वेळ दुपारी १.३० ते ५ वाजता पर्यंत असणार आहे.यामुळे धरणे आंदोलन स्थळी बिआरएसपीच्या हजारो पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष डॉ.विनोद रंगारी यांनी आवाहन केले आहे.