“ईव्हीएम हटाव देश बचाव,यासाठी संभाजी नगर विभागीय आयुक्तांना निवेदन!.. — जागृत नागरी कृती समितीने मोर्चा नंतर दिले निवेदन…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

         वृत्त संपादीका 

         9 डिसेम्बर 2024 रोज सोमवारी छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) येथील क्रांतीचौक येथून विभागीय आयुक्तालयापर्यन्त क्रांती मोर्चाचे आयोजन जागृत नागरी कृती समितीतर्फे करण्यात आले होते.

         देशातील लोकसभा आणि विधानसभेच्या झालेल्या निवडणूका या EVM वर धांदली करुन विशिष्ट राजकीय पक्षालाच सत्तेवर बसविण्यात मुख्य निवडणूक आयोगाने संविधानविरोधी शक्तीचा अदृश्य हात डोक्यावर असल्यामुळे पुढाकार घेऊन संविधानाचे 100% उल्लंघन केले असल्याचे मत जागृत नागरी कृती समिती पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे……!

       त्यामुळे जनतेच्या मताच्या अधिकाराचे हनन करुन आमची लोकशाही आणि संविधान हे संपवण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठीच या क्रांती मोर्चाचे आयोजन या कृती समितीमार्फत करण्यात आले होते.

        यासाठी प्रा.भारत सिरसाट सर, प्रा.मच्छिन्द्र गोर्डे सर,पत्रकार जितेंद्र भवरे सर आणि संविधान विश्लेषक अनंत केरबाजी भवरे सर यांनी परिश्रम घेतले.

         या क्रांती मोर्चात अनिसचे कार्यकर्ते भाऊसाहेब पठाडेसर,कैलास तवार सर,त्यांचे इतर संघटनेचे कार्यकर्ते,उपासिका बोदडे ताई,उपासिका अभ्यंकर ताई,अभ्यंकर सर,निळे प्रतिकचे रतनकुमार साळवे सर (पत्रकार),उपासिका बाभळेताई,उपासिका सपनाताई,दैवशाला गोवंदे ताई इत्यादीनी क्रांती मोर्चात सहभागी झाले होते.

        मोर्चात सर्व उपस्थित मान्यवरांनी छत्रपती संभाजी नगर विभागीय आयुक्तांना,”ईव्हीएम विरोधात,निवेदन दिले.