रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
चिमूर:-
कोलारा गावकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत कमिटी टोलवा-टोलवी करी होती व विविध विकास कामात गैरप्रकार करून,स्वतःच्या हितासाठी जिप्सी वनविभागात लावण्याचा ठराव गावकऱ्यांना अंधारात ठेऊन घेतल्याची बाब गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्याने गावकऱ्यांनी १५ ऑक्टोबरला संतप्त गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयास ताला ठोकला व आंदोलन केले होते.
आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने गावकऱ्यांच्या मागण्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते.मात्र दोन महिन्याचा कालावधी लोटूनही कोलारा वासीयांच्या पदरी निराशाच आली आहे.या समस्या लवकरात लवकर मार्गी न लागल्यास कोलारा गावकऱ्या तर्फे मोठे आंदोलन करण्याचा इशारा शुक्रवारला जिल्हाधिकारी व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून प्रशासनास दिला आहे.
२८ ऑगस्टला झालेल्या ग्रामसभेत विषय बाजूला ठेवून वनविभागाच्या पत्राचे वाचन न करता गाव मर्जीतील चार जिप्सी वाहने सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक यांनी मनमानी करत ग्रामपंचायती मधील मूळ दस्तावेजामध्ये खोट्या व बनावट कागद पत्राचा समावेश करून फेरफार केला.
ग्रामपंचायत हद्दीतील बाभळीच्या झाडाचे लिलाव करण्यात आले.मात्र या विषयी ग्रामसभेत वाचन न करता शासकीय मालमतेची अफरातफर केली आहे.मनरेगा अंतर्गत ग्रामपंचायत यंत्रणेकडून केलेली रोडची कामे शंकर सिडाम ते रतिराम डेकाटे,मारोती येरमे ते पंचफुला कोडापे,मधूकर मेश्राम ते बुधाराम शेंडे,शांताबाई शेंडे ते दयाराम गणवीर योचे घरापर्यत रोडचे सर्व बांधकाम निकृष्ठ दर्जाचे आहेत.
रतिराम डेकाटे यांच्या खाजगी बोअरवेलचे पाणी रस्ता बांधकामासाठी वापरले.मात्र पाणी बिलाची रक्कम अफरातफर करून सरपंच, ग्रामसेवक व दोन सदस्यांनी फसवणूक केली.
सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराला त्रासुन १५ ऑक्टोबरला नागरीकांनी रात्री ग्रामपंचायतला कुलूप ठोकले.
याची तक्रार पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिली.दोन महीन्याचा कालावधी होवून कुठलीही दखल घेतली नसल्याचे निवेदनात नमूद आहे.
सरपंच शोभा कोयचाडे,उपसरपंच सचिन डाहुले, ग्रामसेवक संजय ठाकरे व ग्राम पंचायत सदस्य यांनी कर्तव्यात न राहता कसूर केलेला आहे.अशा बेजबाबदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करून शासकीय मालमत्तेची अफरातफर करणाऱ्या दोषीवर कार्यवाही करून नुकसान भरपाई वसुल करण्यात यावी अशी मागणी कोलारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली.
जिल्हाधीकारी चंद्रपूर व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांना दिलेल्या निवेदनावर साडेतीनशे गावकऱ्यांच्या सह्या आहेत.
निवेदन देताना प्रहार जनशक्ती पक्षाचे शेरखान पठाण,खेमाबाई दसरथ खाटे,मंगला बळीराम धारणे,रतिराम डेकाटे,रतिराम वांढरे,प्रभाकर नैताम,विकास मडावी,रविंद्र जिवतोडे,सज्जन गेडाम,तुलसी रामटेके,रवि बावणे आदी उपस्थित होते.
निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार,जिल्हाधीकारी चंद्रपूर,पंचायत समिती गटविकास अधिकारी चिमूर यांना पाठविण्यात आल्या आहेत.