गडचिरोली जिल्हा अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन तर्फे आयोजित राज्यस्तरीय क्रॉसकंट्री निवड चाचणी स्पर्धा सपन्न….. — तळागळातील विद्यार्थ्यांनी खेळाच्या माध्यमातून जिल्हा, राज्य व देशाचे नाव उज्वल करावे :- आशिष नंदनवार 

प्रितम जनबंधु

    संपादक 

आरमोरी :- महाराष्ट्र अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन च्या सूचनेनुसार गडचिरोली जिल्हा अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन तर्फे आज दि.१०/१२/२०२३ ला सकाळी ७:३० वाजता आरमोरी येथील वडसा रोडवरील टी.सी.सी. ग्राऊंड वर जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धा आयोजित करण्यात आली.

                सदर स्पर्धा चार गटात घेण्यात आली ज्यामध्ये पुरुषांच्या खुला गटात १० किमी अंतर पार करत प्रकाश रमेश  मिरी याने प्रथम क्रमांक पटकावला तर आकाश जयदेव पुंघाटे याने द्वितीय क्रमांक पटकावला तर महिलांच्या २० वर्षाआतील गटात पिंकी दशरथ मडावी हिने प्रथम क्रमांक पटकावला तर १८ वर्षाआतील मुलांच्या गटात यश राजु भांडेकर तर द्वितीय क्रमांक रोहन संजय भुरसे याने पटकाविला तर १६ वर्षाआतील मुलांच्या गटात गौतम सदानंद बांबोळे याने प्रथम क्रमांक पटकावला.

                 १६ वर्षाआतील मुलींच्या गटात वैष्णवी प्रवीण दाते प्रथम तर जान्हवी नरेंद्र आकरे हिने द्वितीय क्रमांक पटकवीत दि. १७ डिसेंबर २०२३ ला बुलढाणा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.

           या स्पर्धेचे आयोजन गडचिरोली जिल्हा अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन चे सचिव आशिष नंदनवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संयोजक राहुल जुआरे सर व क्रीडा समन्वयक दलसू तुमरेटी यांच्या सहकार्याने पार पडले.