राष्ट्रीय मानव अधिकार संघटना दिल्ली द्वारा गडचिरोली शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल राष्ट्रीय समाजगौरव पुरस्काराने सन्मानीत..

   राजेंद्र रामटेके

ग्रामीण तालुका प्रतिनिधी

       कुरखेडा 

गडचरोली :- ..शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल गेल्या 30 वर्षा पासून जील्ह्यातील आदिवासी दुर्गम, नक्सलग्रस्त भागात गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी झटत आहेत.

        जील्ह्यातील जनतेला न्याय मिळावा म्हणून शेकडोच्या वरती मोर्चे काढून अन्याय ग्रस्तांना न्याय मिळवून दिला.

        त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय मानव अधिकार संघटन दिल्ली यांच्या वतीने,”राष्ट्रीय समाज गौरव पुरस्काराने,गौरविण्यात आले.

       महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार बाबा आत्राम यांच्या हस्ते आज शिल्ड आणि मानपत्र देवून सदर पुरस्काराने गौरविण्यात आले.

         या प्रसंगी खासदार अशोक नेते, गडचिरोली विधान सभेचे आमदार देवराव होळी, आरमोरी विधानसभेचे आमदार कृष्णा गजभे, मानव अधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश पटेल, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वागरे,महाराष्ट्र मानव अधिकार प्रदेशध्यक्ष प्रणय खुणे,राष्ट्रवादी नेते नाना भाऊ नाकाडे,पदमश्री पुरस्कार प्राप्त डॉ.परशूराम खुणे तथा मानव अधिकार संघटनेचे पदाधिकारी आणि विविध संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते सत्कार सोहळ्या प्रसंगी उपस्थित होते.