ऋग्वेद येवले
नागपूर विभागीय प्रतिनिधी
साकोली- सेंदूरवाफा येथील बिरसा मुंडा चौक येथे शहीद वीर नारायण सिंह बिंझवार यांच्या बलिदान दिवसाचे औचित्य साधून बिंझवार / इंजवार समाजातर्फे श्रद्धांजली कार्यक्रम मोठ्या संख्येने घेण्यात आले.वीर नारायण सिंह बिंझवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
वीर नारायण सिंह बिंझवार हे बिंझवार समाजातील तसेच छत्तीसगड जिल्ह्यातील पहिले स्वातंत्र्य सेनानी, क्रांतिकारी देशभक्त म्हणून ओळखले जातात त्यांच्या जन्म इसवी सन.२३ जून १७९५ बडोदा बाजार जिल्ह्यातील सोनाखान गावामध्ये छत्तीसगड राज्यामध्ये झाला. ते गरिबांचे मसिहा होते. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धादरम्यान ते तुरुंगातून निसटले आणि ब्रिटिशांविरुद्ध लढले ज्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली. १० डिसेंबर १८५७ रोजी त्यांना रायपूरच्या जयस्तंभ चौकात फाशी देण्यात आली.
अशा त्यांच्या महान कार्याचा इतिहासाची माहिती प्रत्येक समाज बांधवांनी आपल्या पुढच्या पिढीला सांगावी व घरी शहीद वीर नारायण सिंह यांची प्रतिमा ठेवून प्रत्येक वर्षी बलिदान दिवस साजरा करण्यात यावा अशी समाज बांधवांना विनंती कार्तिक लांजेवार यांनी केली. समाज जागृत व्हावा व सर्व संघटित राहावे यासाठी निशाताई सोनवाने यांनी नारा देत म्हटलं की एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान अशा घोषणा देत सर्व आदिवासी बांधवांनी एकत्रित येऊन शिक्षण घेऊन संघटित होऊन बिंझवार / इंजवार आदिवासीयांनी समोर उद्भवणाऱ्या प्रश्नांचा विचार मंथन करून संघर्षातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. तसेच युवराज मेश्राम यांनी मार्गदर्शन पर भाषण दिले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सुभाष न्यायमूर्ते, अर्चना न्यायमूर्ते उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विष्णू चौधरी, विलास बागडे, उत्तम लांजेवार , जितेंद्र सोनवाने,महेंद्र चौधरी, विनोद मेश्राम ,मारुती मेश्राम, कीर्ती चौधरी,अश्विनी चौधरी,शोभा सोनवाने, शीला चौधरी ,पिंकी मेश्राम, वच्छला बागडे व सर्व समाजातील सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.