सावली:(सुधाकर दुधे)
देशामध्ये अनेक उच्च पदस्थ, राजकारणी ,समाजसेवक, संस्था ,संघटना चालविणा-या गणमान्य व्यक्तीचा सत्कार समारंभ होत असतातच, पण सावली सारख्या ग्रामीण भागात नेहमीच मी स्वच्छतेचे कार्य करीत आहे, रस्त्यावर, कार्यालयासमोर दिसत.असलेला केरकचरा उचलून विल्हेवाट लावणे हे माझे कार्य आहे, याच स्वच्छतेच्या कार्याची पावती म्हणजे माझा सत्कार आहे ,असे मत स्वच्छतादुत परेश भाई तावाडे यांनी केले ,ते दै देशोन्नती शी बोलत होते.
नुकताच सावली वाचनालयाचा वर्धापन दिन सोहळा पार पडला ,या कार्यक्रमात अनेकांचा सत्कार करण्यात आला,यावेळी सावली येथील सर्वधर्मसमभाव संस्थेचे अध्यक्ष तथा स्वच्छता दुत परेश भाईचा सत्कार करण्यात आला, स्वच्छतेचे पुजारी संत गाडगेबाबा ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ,यांच्या स्वच्छ ग्राम असावे, आपले गाव स्वच्छ दिसावे अशी प्रेरणा घेऊन परेश भाई तावाडे नेहमीच राष्ट्रीय महा मार्गावरील पोस्ट आफिस ,पोलीस स्टेशन, गोळीबार चौक, जयभीम वाचनालय परिसर आदी ठिकाणचा नित्य नेमाने केरकचरा साफ करून परिसर.स्वच्छ करीत असतो, यापूर्वी सुध्दा अनेक कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला,पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सुध्दा त्यांचा सत्कार करण्यात आला ,सोबतच अनेक पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे,केंद्र सरकार,राज्य सरकारने स्वच्छ भारत स्पर्धा आयोजित केल्या होत्या, शहरी,ग्रामीण भागात सुध्दा स्वच्छतेसाठी पुरस्कार दिल्या गेले, परंतु परेशभाई हे कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न करता आपल्या हाती घेतलेल्या स्वच्छतेच्या वसेशी गुंतुन असतात ,त्यांचे हे कार्य नित्य नेमाने सुरू आहे …