नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
लाखनी -लाखनी तालुक्यातील मौजा किटाडी येथे साक्षी महाराज (दिल्ली)यांच्या हस्ते सिद्ध साक्षी धामचे उद्घाटन करण्यात आले.
डमदेव कहालकर महाराज यांनी 56 वा वाढदिवस अडीच एकर जमीन किटाडी येथे साक्षी धामकरीता दान करुन साजरा केला.यावेळी सिद्ध साक्षी महाराज यांनी आपल्या अमृतवाणीतून लोकांना अध्यात्माचे दर्शन दिले तसेच व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमाला साकोली व लाखनी तालुक्यातील भरपूर भाविकांनी उपस्थिती लावली होती. साकोली किटाडी,गिरोला, मोहघाटा ,खराशी ,बरडकिनी, येथून हजारोच्या संख्येत भाविकांनी आपली उपस्थिती दर्शविली .यावेळी झाडीपट्टी भागातील आदिवासी नृत्य तसेच दंडार सादर करण्यात आले व नंतर जागरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. डमदेव कहालकर महाराजांनी येणाऱ्या भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती.
डमदेव कहालकर महाराज व त्यांच्या पत्नी मीराबाई कहालकर यांच्याकडून अपंग ,प्रतिष्ठित व्यक्ती, पत्रकार, गुणवंत विद्यार्थी, समाजसेवक असे एकूण 56 लोकांचा शाल व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मंचावर परिणय फुके विधानपरिषद सदस्य भंडारा गोंदिया ,मदन रामटेके समाज कल्याण सभापती जि.प.भंडारा, हेमकृष्णा कापगते माजी आमदार साकोली विधानसभा, होमराज कापगते पंचायत समिती सदस्य, ताराचंद हत्तीमारे ,भोजराज लंजे व अनेक मान्यवर उपस्थित होते.