ऋषी सहारे
संपादक
आरमोरी विधानसभा क्षेत्रात आजाद समाज पार्टीचे उमेदवार चेतन नेवशा काटेंगे यांच्या प्रचारार्थ जिल्हा प्रभारी धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, कार्याध्यक्ष विनोद मडावी यांच्या नेतृत्वात गावागावात ताफ्यासह जोरदार प्रचार सुरू असल्याने जनमानसात चर्चांना ऊत आला आहे.
कोंढाळा, कुरुड, जुनी वडसा, वडसा, शंकरपूर परिसरात प्रचार करताना आजाद समाज पक्षाचे जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके, संघटक हंसराज उराडे, विधानसभा अध्यक्ष ऋषी सहारे, महिला जिल्हासचिव शोभा खोब्रागडे, आरमोरी तालुकाध्यक्ष ऍड. नर्गिस पठाण, गडचिरोली शहर अध्यक्ष नागसेन खोब्रागड, गडचिरोली तालूका महिला अध्यक्ष सविता बांबोळे, आरमोरी कार्याध्यक्ष पुरुषोत्तम मैंद, शहराध्यक्ष नितीन भोवते, युवा आघाडी अध्यक्ष शुभम पाटील, उपाध्यक्ष पियुष वाकडे, तथा वडसा – आरमोरीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.