शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात वंचितचे सिलेंडर करणार स्फोट, वंचित व महायुती यांच्यात थेट लढत…

युवराज डोंगरे /खल्लार 

           उपसंपादक 

        दर्यापूर तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावात चारही सर्कलमध्ये सध्याच्या परिस्थितीत वंचित व अडसूळ यांचा सामना चांगल्या तऱ्हेने रंगत आहे असे प्रत्येक गावात खेड्यापाड्यात चावडीवर प्रत्येक नागरिकाच्या तोंडून ऐकल्या जात आहे.

        अशाच प्रकारे दर्यापूर अंजनगाव विधानसभा निवडणुकीत धनुष्यबाण व गॅस सिलेंडर यांच्यात थेट होणार लढत शिवसेनेच्या गड असलेल्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघात आता अडसूळ विरुद्ध गॅस सिलेंडर अशीच लढत होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

        यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे पारडे जड असून प्रतिसाद मिळत आहे.माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ वंचितचे उमेदवार अंकुश भाऊ वाकपांजर यांच्यात थेट सामना रंगणार आहे.

          दोन्ही उमेदवार आपापल्या कार्यकर्त्यांसह प्रत्येक गावागावांमध्ये प्रत्येक चौकात चावडी व यांचे कार्यकर्ते थेट मतदारांना भेटत आहेत.

         राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने व महायुतीनेही वंचित बहुजन आघाडीची धास्ती घेतलेली आहे.

         राज्यातील 199 मतदार संघात आपले उमेदवार उभे केलेले आहेत. यातील जवळपास 28 मतदार संघातील उमेदवार आघाडी व महायुतीला धक्का देते अशी वंचित बहुजन आघाडीला अपेक्षा आहे.

          या सर्व जागा पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील आहे 70 ते 75 मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचमकदार कामगिरी करण्याचे दिसून येत आहे.

         विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नसल्याने मतदार हे महायुती आणि आघाडी नाराज आहे.उलट वंचित बहुजन आघाडीने सर्वाधिक मुस्लिम उमेदवार दिले असल्याने या मताचा फायदा दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघात होत असल्याचे दिसून येत आहे.

         मुस्लिम समाज जसा नाराज आहे तसेच आरक्षणाचे उपवर्गीकरण बौद्ध समाजात नाराजी पसरली आहे, तर आरक्षण प्रश्नावरून मराठा व ओबीसी समाजात मोठी चेन निर्माण झाली आहे.

        या सर्व समाजांना महाविकास आघाडी व महायुतीने फसवले असल्याचा दावा करत त्यांच्या नाराजीचा लाभ दर्यापूर अंजनगाव मतदार संघात होत असल्याचे दिसून येत आहे.