माजी राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या प्रचारार्थ रूपालीताई चाकनकर महिला आयोग अध्यक्षा यांची इंदापूर येथे आज उपस्थिती. — याप्रसंगी अनेक दिग्गज नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार..

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

          इंदापूर तालुका विधानसभेचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय मामा भरणे यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर येत आहेत.त्यांची आज रविवार दिनांक 10 /11 /2024 रोजी दुपारी 2 वाजता संत सावतामाळी मंदिर सावता नगर इंदापूर येथे सभा होत आहे.

        प्रचार सभेला उपस्थित मतदारांना बंधु भगिनींना राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना मतदान करण्यासाठी आवाहन करणार आहेत.

        इंदापूर तालुक्यातील कार्यकर्ते व मतदार बांधव सभेला जास्ती जास्त उपस्थितीत राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

           आजच्या होणाऱ्या प्रचार सभेत काही दिग्गज नेते व ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पक्षप्रवेश होणार आहे.कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक अतुल नानासाहेब व्यवहारे यांचा देखील आज पक्ष प्रवेश होणार आहे.

       माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार यांना तिसऱ्यांदा आमदार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील तरुण आणि तडफदार कार्यकर्ते कामला लागले आहेत. 20 नोव्हेंबरला दत्ता मामा भरणे यांना भरगच्च मतदान घडवून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची धावपळ चालू आहे.