महाराष्ट्रीयन मतदारांनो 20 नोव्हेंबरला मतदान करताना,हे लक्षात ठेवा… — भाग ७……

लोकशाही केवळ निवडणुकीपुरतीच नसते……

      तर ती आमच्या व भावी पिढीच्या कायम उन्नतीची प्रक्रिया असते..

सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यानो….

     ज्याप्रमाणे जनता आणि व्यवस्था यांचे माध्यम म्हणजे पत्रकारिता,अगदी त्याचप्रमाणे मतदार आणि राजकीय पक्षांचे नेते यातील माध्यम म्हणजे तुम्ही ( कार्यकर्ता ).

      गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही तुमच्या नेत्यासाठी तन -मन -धनाने निवडणुका असो,नसो समर्पित होऊन झोकून कुटुंबासहीत त्याग करुन त्या नेत्यांची,राजकीय पक्षांची निःस्वार्थपणे सेवा करता.आणि आपला पक्ष तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवता.

         या धावपळीच्या आणि संघर्षाच्या काळात तुमचा तो नेता तुमच्या पाठीवरून साधा हात जरी फिरवला तरी तुमची छाती स्वाभिमानाने फुगायची….

       परंतू,आज पाठीवरून हात फिरवीणारे नेते राहिले नाहीत. एवढेच काय एखादा तळमळीचा कार्यकर्ता जरी असला तरी त्याच्यावर शंका घेतो आणि अनेक वर्षांपासून असलेला विश्वास मोडीत काढतो.

जेंव्हा अशी वेळ येते……

    तेंव्हा तुमच्या हृदयाला पीळ बसल्याशिवाय राहत नाही.

    एवढी वर्षे सेवा केल्याचा मोबदला तो काय तर “अविश्वास”!

    जीवन समर्पित होऊन केलेल्या संघर्षाचे चीज करणारे नेते आजच्या घडीला राहिले नाहीत..

          परंतू,तुमच्याशी जोडलेला मतदार मात्र हा कधीच नाळ तोडणारा नसतो.भलेही तुम्ही सांगितलेल्या उमेदवाराला मतदान देईल किंवा नाही तो भाग वेगळा.परंतु,तुमच्या सुखदुःखात सहभागी होणारा हा मतदारच असतो…

      कार्यकर्त्याचा नेता झालाय असं कधीतरी झालय का…..? ( एखादे दुसरे अपवाद सोडा )…..

      परंतू,वडापाव खाऊन भूक भागविणारे तुम्ही, तुमच्या जीवावर ते सत्तेच्या खुर्चीत वर्षानुवर्षे बसणारे.तुमच्यावर जर कधी आर्थिक संकट आले किंवा दवाखान्याची वेळ आली तर…

      “तो कार्यकर्ता ” वर्षानुवर्षे आपला होता,पण या निवडणुकीत त्याने दुसऱ्याचा प्रचार केला म्हणून साधी भेटही न देणारे दगडाच्या काळजाची ही औलाद तुम्हाला जन्मभर कशी कळाली नाही?

     कार्यकर्ता हा,”घर का ना घाट का,अशी अवस्था होऊन जाते.निवडणुकीच्या सुगीच्या हंगामात जे कांही आर्थिक लाभ मिळतात,ते काय साढेचार वर्षे थोडीच टिकतात..

      परंतू,जीवनातील अनेक जगण्याच्या मार्गांवरून भरकटल्यामुळे मुलाबाळांना योग्य संस्कार किंवा उच्चं शिक्षण सुद्धा देऊ शकत नाही….

    एवढेच काय कुणी मुलगी सुद्धा देण्यासाठी कचरतात.

        अशा वेळी तुम्ही जीवनातील सर्वस्व हरवून बसता.स्वाभिमानाला तर मारूनच टाकावे लागते.पण तरी सुद्धा परिवारासाठी जगणे आवश्यक असते.म्हणून नेत्यांच्या हुजरेगिरीला संपत्ती समजून जीवन व्यतीत करता…..

    करता…….

 एक दिवस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन घेता!!!

     परंतू ,शेवटी प्रश्न उरतो तो हाच की,तुमच्या,त्याग,संघर्षाचे,समर्पणाचे मोल कोणते?

या प्रश्नाचे उत्तर तुम्हांला कदाचित सापडणारही नाही..

   आणि जर कधी सापडलेच तर तेंव्हा वेळ निघुन गेलेली असेल!

तेंव्हा कार्यकर्त्यानो….

     प्रथम तुम्ही या देशाचे एक जबाबदार नागरिक आहात. प्रत्येक जबाबदार नागरिक हा देशाचा मालक असतो.आणि मालक हा क्षुल्लक स्वार्थासाठी हुजरेगिरी न करता स्वाभिमानाने,ताठ मानेनेच जीवन व्यतीत करणारा असतो..

    तेंव्हा आजच निर्धार करा की, आजपर्यंत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसाठी काम केले. लाभ झाला नाही.

      तर आजतरी निदान संविधान जागृतीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत जर तुम्ही काम केले, तर निश्चितच तुमची जरी नसली, तरी तुमच्या लेकरांचे भवितव्य उज्वलहोईल.

    अन्यथा गव्हासोबत किडेही रगडले जातील……!

      शेवटी कार्यकर्ता हा कार्यकर्ताच असतो.मग तो राजकीय पक्षाचा असो अथवा कोणत्याही सामाजिक संघटनेचा असो.तो निर्मळ अंतःकरणाने आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असतो.त्याच्या मेहनतीची कदर ना सरकार घेते,ना नेते घेतात ( Use & Throw), ना ही समाज घेतो.तो कधी कधी कुटुंबातून सुद्धा बेदखल होतो..

         पण शेवटी हे निश्चितच खरे असते की, शकार्यकर्त्याला एखादा कार्यकर्ताच ओळखून तन,मन आणि धनाने मदतीतून व्यक्त होतो.पण त्यालाही हतबलतेने मर्यादा येतात.

        परंतू,कार्यकर्त्याने वेळीच सावध होऊन या नेत्यांच्या हुजरेगिरीपेक्षा महापुरुषांच्या क्रांतीचे चक्र फिरविण्यात जर झोकून दिले,तर निश्चितच हाच कार्यकर्ता समाधानाने जीवन व्यतीत करू शकतो.

       तेंव्हा आजच निर्धार करा की,संविधान जागृती देशाची प्रगती हेच ब्रीद आमचे कल्याण करेल.

    इतर कोणताही उपाय नाही..

****

विनंती :- प्रत्येकांनी आजपासून 20 नोव्हेंबर पर्यंत मतदान जागृतीसाठी दररोज येणाऱ्या सर्व पोस्ट आपल्या मोबाईल मधील जेवढे व्हाट्सप गृपआणि मो. नं. असतील त्यावर अपलोड करुन व्हायरल कराव्यात…..

*****

आवाहनकर्ता आणि जागृतीचा लेखक

       अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर,7875452689…