रमेश बामनकर /अहेरी प्रतिनिधी 

 

अहेरी :- तालुक्यात नुकतेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकां च्या निकाला नंतर उपसरपंच पदा साठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.

अहेरी तालुक्यातील खांदला ग्रामपंचायत मधील सदस्य पदासह थेट सरपंच १६ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि १८ऑक्टोबर रोजी या निवडणूकीचा निकाल जाहीर झालं यात तालुका महामंत्री पोशालू चुदरी यांच्या नेतृत्वात भाजप चे उमेदवार थेट सरपंच पदावर आणि एक सदस्य निवडून आले.राकॉ चे चार व आविस चार सदस्य निवडून आले होते. उपसरपंच पदासाठी राकॉ व अविस मध्ये रस्सीखेच सुरु असताना राकॉ ने अविस च्या एका सदस्य ला आपल्या पदरात पाडण्यात यश आलं आणि राकॉ उमेदवार राकेश सिडाम यांनी उपसरपंच पदी निवडून आले.निवडणूक कार्यक्रम पाडण्यासाठी नायबतहसीलदार खोत सा. यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पहिले. या वेळी सचिव एस. एस. सडमेक, सरपंच सुमनताई आलाम, भाजपा महामंत्री पोशालू चुदरी, राकॉ चे नेते ऋतुराज हलगेकर, जिल्हासचिव कैलास कोरेत, विजय अंबलिपवार, माजी सरपंच विनायक आलाम, संतोष गणपूरवार, अशोक आत्राम,तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, सांबय्या करपेत,रोशन कांबगोणीवार, सूर्यकांत आत्राम, स्वप्नील श्रीरामवार, पांडू आलाम,नारायण आत्राम आदींनी उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com