रमेश बामनकर /अहेरी प्रतिनिधी 

 

अहेरी:- तालुक्यातील इंदाराम येथील हनुमान मंदिरात गुरु माऊली भजन मंडळ, काकड आरती सेवा समिती, तुळशी विवाह समिती वतीने काकड आरती व तुळशी विवाह उत्सव सोहळा पार पडला.

 अश्विन शुद्ध पौर्णिमेला काकड आरतीचे सुरुवात झाली प्रती दिवस प्रभात समयी मंगलमय वातावरणात मंदिरात मोठया श्रद्धेने भजन, सत्संग, अभंग,गौळणी, काकड आरती नित्य नियमाने करत असत.या मासिक कार्यक्रमाचे सांगता कार्तिक शुद्ध पौर्णिमेला होते.काल रोजी तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करून भजन, सत्संग काकड आरती करून श्री पांडुरंगाची पालखी चे संपूर्ण गावात ढोल तासे, फटाक्याचे निनादात भक्तिमय वातावरणात भव्य मिरवणूक यात्रा काढण्यात आले.त्या नंतर गोरज मुहूर्तावर तुळशी विवाह भट पुरोहित व्येकंटेश कोत्तावडलावार यांच्या मंत्रोपच्चाराने कंकन धारक माजी जि. प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व माजी प. स. उपसभपती सोनालीताई कंकडालवार यांच्या हस्ते विधिवत पूजन करून तुळशी विवाह संपन्न करून गोपाळकाला करण्यात आले.

  सदर कार्यक्रमात गावातील अतिगरीब चार जोडप्याचे लग्न लावून त्यांना अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून संसारपयोगी भेटवस्तू देऊन एक सामाजिक दायित्व निभावले. आणि महाप्रसाद वितरण करण्यात आले. काकड आरती, तुळशी विवाह व लग्न सोहळ्याला हजारोंच्या संख्येने महिला पुरुष भाविकाची गर्दी उसळली.यावेळी ग्रामपंचायत इंदाराम चे सरपंच वर्षाताई प्रल्हाद पेंदाम, माजी जि. प. सदस्य अजय नैताम सह अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रम यश्वीतेसाठी गुरू माऊली भजन मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास कोत्तावडलावार, उपाध्यक्ष वसंत मेश्राम सचिव साईनाथ गोमासे तबला वादक रोहित कोत्तावडलावार, पेटी वादक अविश दुर्गे, शंकर चकणारपवार, पद्मनाभम कविराजवार, किशोर तेलंगे, नागेश औतकर, गणेश पोगुल वार, श्रीनिवास रेपाकवार, शुभम औतकर, विनोद औतकर, छगन आत्राम व काकड आरती समितीचे वैभव कंकडलवार, सुरेश मेश्राम, नितीन मेश्राम, कोटेश्वर कोत्तावडलावार, बालचंद्र मेश्राम, अमर औतकर, सुरेश कोत्तावडलावार, मिथुन दुर्गे, बापूजी औतकर, कमलाकर हजारे, श्रीनिवास तेलंगे, विवेक औतकर, अक्षय बत्तुलवार, तिरुपती रमगिरिकर, अजय कुळमेथ, नरेंद्र दुर्गे, संतोष पुसलवार, महेश बावणे, उपेंद्र हजारे, रोशन सामलवार, विश्वजित मेश्राम, सुरेश कोसरे, व्येंकटेश औतकर, प्रकाश कोसरे, स्वप्नील काटेल, राकेश सोयाम आणि तुळशी विवाह समितीचे महिला आदींनी सहकार्य केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com