पारशिवनी:- साधारण 22 वर्ष अगोदर पारशिवनी तालुक्यातील पेंच धरणाच्या लगेचच्या नवेगाव खैरी गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या परिवारात असलेले श्री दशरथ रामराव भागडकर शेत तरुण गावाकडे रोजगार व्यवसाय नसल्यामुळे व शेतीतील उत्पन्न पाहिजे तसे होत नसल्याने परिवाराचे उदरनिर्वाह व मुलांचे शिक्षणाच्या प्रश्न डोळ्यापुढे ठेवून तसेच परिसरात वाढती नशाखोरी यामुळे गाव सोडण्याचा ठोस निर्णय घेतला आणि पुण्याच्या दिशेने प्रस्थान करण्याच्या मार्ग निवडला.
पुण्यात आदी कोणाची ओळख नव्हती, नातेवाईक नव्हते अशी जोखीम पत्करून ते पुण्यात पोहोचले. मिळेल ते काम करण्याची तयारी आणि तसेच काम सुरू केले.
संघर्ष करण्याची मानसिकता संकटाना न घाबरता कामात सातत्य टिकवून ठेवले. मुलांना शिक्षण देऊन त्यांना योग्य व काबिल बनवले. याचाच परिणाम आज त्यांचा मुलगा अमेरिकेत हॉटेल व्यवसाय प्रगती करत आहे.
श्री दशरथ भागडकर हे पारशिवनीला काही कामानिमित्त आले असल्याची माहिती मिळाल्यावर शेतकरी नेते संजय सत्येकार यांच्या पुढाकाराने पारशिवनी येथे राजू दुनेदार यांच्या प्रमुख उपस्थित त्यांच्या घरी श्रीफळ देऊन त्यांच्या सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने पारशिवनी मज्जिद कमिटीचे अध्यक्ष मौलाना रफी साहेब तसेच सचिव मोहम्मद अफरोज रशीद खान व सामाजिक कार्यकर्ता श्री बशीर वराडे, रवींद्र भोयर, श्रीकृष्ण घोडागाडे, विनोद ढोंगे इत्यादी उपस्थित होते. यावेळी रवींद्र भोयर यांनी श्री दशरथ रामराव भागडकर यांची प्रेरणा घ्यावी असे मनोगत याप्रसंगी व्यक्त केले तसेच उपस्थितांचे आभार व्यक्त केले.