उपसंपादक/अशोक खंडारे
श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 10 /10/ 2022 रोजी स्वर्गीय प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे यांच्या पुण्यतिथीनिमित आष्टी ग्रामीण रुग्णालय येथे भरती असलेल्या कुपोषित लहान बालकांना व सर्व रुग्णांना फळ व बिस्किट वितरणाचा कार्यक्रम तसेच ग्रामीण रुग्णालय आष्टी व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जंतनाशक औषधी वितरणाचा कार्यक्रम आणि अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ पी के सिंग तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रंथालय विभाग प्रमुख व रासेयो समन्वयक डॉ रमेश सोनटक्के वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ अपर्णा मारगोनवार व रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ एम पी सिंग हे मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून डॉ रमेश सोनटक्के यांनी स्वर्गीय प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे यांनी गडचिरोली ते चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये तळागाळातील आदिवासी व मागासवर्गीय व सर्व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्या यासाठी दोन्ही जिल्ह्यात वरिष्ठ कला विज्ञान महाविद्यालयापासून बीएड एम एड डी एड ते कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय माध्यमिक व प्राथमिक शाळा कॉन्व्हेंट ते वस्तीगृह स्थापन करून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील अति मागासलेल्या समाजातील विद्यार्थ्यांन पर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्याचे महान कार्य केले म्हणूनच त्यांना शिक्षण महर्षी ही उपाधी देण्यात आली त्यांनी केलेल्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक व शैक्षणिक कार्याची विस्तृत माहिती व त्यांचा जीवनपट आपल्या प्रास्ताविकातून सर्व विद्यार्थ्यांसमोर मांडला डॉ अपर्णा मारगोनवार यांनी आष्टी येथे विज्ञान महाविद्यालयाच्या स्थापनेपासून महाविद्यालयाने आतापर्यंत जी काही प्रगती केलेली आहे ती व महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सोयी सुविधां ह्या स्वर्गीय प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे यांचीच पुण्याई आहे असे सांगितले डॉ एम पी सिंग यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ पी के सिंग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतान सांगितले स्वर्गीय प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे यांनी लावलेल्या शैक्षणिक रोपट्याचा वटवृक्ष झालेला असून त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्रांतीमुळेच आपण सर्व या महाविद्यालयात शिक्षणाचा लाभ घेत आहोत असे विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन प्रा सुबोध साखरे तर आभार प्रदर्शन महेश सिल्लमवार यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथील डॉ दामोदरे डॉ कुकुडकर परिचारिका आशा सोनवणे महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ सोनाली धवस डॉ प्रदीप कश्यप डॉ दीपक नागापुरे डॉ प्रकाश राठोड प्रा स्वप्नील प्रासचिन मुरकुटे प्रा जया रोकडे राहुल आवारी कवींद्र साखरे धुरके संदीप मानापुरे ,विजय खोब्रागडे , अविनाश जीवतोडे कुमारी शुभांगी डोंगरे, रमेश वागदरकर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते