नीरा नरसिंहपूर, दिनांक.10-प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,
राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना कोरोनाकाळातील कामाबाबत बोनस न देण्याच्या निर्णयाविरोधात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयावर दि, 11 आक्टोंबरला भव्य मोर्चा धडकणार आहे. त्यासाठी राज्यातील लाखों आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक मुंबईला मार्गस्थ झाले आहेत.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे आरोग्याचे काम किती महत्वाचे आहे, ते कोरोना काळात बघायला मिळाले आहे. परंतू शासन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्याकडे कायमच दुर्लक्ष करत आले आहे. कोरोनामध्ये काम करणाऱ्या कर्मचान्यांना शासनाने बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू त्यामध्ये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे नावच नाही. एकीकडे आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना शाबासकी दिली जाते. ज्यावेळी पैसे देण्याची वेळ येते त्यावेळेस शासन दुर्लक्ष करते.
शासनाचे यासह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दि 11 आक्टोंबरला मंत्रालयावर महाराष्ट्रातील सर्व आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांचा धडक मोर्चा आयोजित केला असल्याचे प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे