सतिश कडार्ला,

गडचिरोली,(जिमाका)दि.10: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीआणि जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारदि.14 ऑक्टोबर 2022 रोजी गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली येथे पंडीत दिनदयाल रोजगार मेळावा आयोजित करण्यांत आलेला आहे.

 

    सदर रोजगार मेळाव्यामध्ये नवकीसान बायोप्लॅनटेक लिमीटेड नागपूर, डिस्टील एज्युकेशन & टेक्नॉलाजी प्रा.लि.नागपूर, मंगल फायनान्स गडचिरोली, रुचा /बडवे इजिनीअरीग औरंगाबाद, एस बी आय लाईफ इन्सुरन्स गडचिरोली, एल. आय. सी. गडचिरोली, क्वीज कॉर्प लिमिटेड पुणे, इनोव्हसोर्स नागपुर व इतर कंपन्या उपस्थित असणार असून‍ सदर रोजगार मेळाव्याकरिता ईच्छूक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेराक्स सह स्वखर्चाने दि.14 ऑक्टोबर 2022 रोजी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयास संपर्क साधावा. दुरध्वनी क्रंमाक 07132-222368 हा आहे.

असे आवाहन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली या कार्यालयाने केले आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News