दारिद्रयरेषे वरील मुलांना मोफत गणवेशासह बूट,पायमोजे देखील मिळणार.‌‌

 

डॉ.जगदिश वेन्नम

     संपादक

गडचिरोली:-

       राज्यात दारिद्र्यरेषे वरील शिकणाऱ्या पहिली ते आठवीत मुलांना देखील मोफत गणवेश देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

        बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.मोफत गणवेशा सोबतच दरवर्षी एक बूट जोडी आणि दोन जोडी पायमोजे देण्यात येतील.

        या निर्णयामुळे मागास व दारिद्रय रेषेखाली विद्यार्थ्यांप्रमाणेच दारिद्र्य रेषेवरील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार आहे.

         या वर्षापासूनच याची अंमलबजावणी करावयाची असल्याने या आर्थिक वर्षाकरिता ७५ कोटी ६० लाख रुपये,तसेच बूट,पायमोज्या करिता ८२ कोटी ९२ लाख रुपये इतका निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

       सध्या अनुसूचित जाती,जमाती,भटक्या जमाती तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या मुलांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येतो.