साकोली: महाराष्ट्र वाहतूक सेना शाखा साकोली तालुका अध्यक्ष महेश पोगडे यांच्या सौजन्याने प्रभाग क्रमांक पाच व प्रभाग क्रमांक सहा मध्ये सिमेंट खुर्च्या लावण्यात आले.
सामाजिक कार्यात आवड असणारे सामाजिक कार्यकर्ते महेश पोगडे यांनी यापूर्वी हनुमान चौकातील उघड्यावर असलेल्या विहिरीवर लोखंडी झाकण बसवून नागरिकांना खूप मोठा दिलासा दिला आहे एवढेच नव्हे तर रस्त्याचे भूमिपूजन, बंद असलेले गटार साफ केले आणि आज दिनांक 10 ऑक्टोबरला शहरातील प्रभाग क्रमांक पाच व सहा मध्ये सहा सिमेंट खुर्च्या बसवल्या .महेश पोगडे यांच्यावर कौतुकाचे वर्षाव होत आहे. यावेळी वाहतूक सेनेचे साकोली शहर अध्यक्ष गजेंद्र लाडे, अनिल डोमळे ,मनीषा पोगडे व अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.