पारशिवनी::- ( वार्ताहर )पारशिवनी तहसिल च्या महसुल विभाग व खापरखेडा पोलिसांच्या डि बी पथका नी संयुक्तरित्या कार्यवाही करीत शनिवारी ( दि . ८ ) दुपारी पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारडी ( ता . पारशिवनी ) पारडी शिवारात धाड टाकत एकूण १२५ ब्रास रेतीसाठा जप्त केला.
या रेतीची बाजार भावाप्रमाणे एकूण किंमत ७ लाख ५० हजार रुपये ( वाहतूक खर्च वेगळा ) आहे.पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांचे आदेश प्राप्त होताच खापरखेडा पोलिसांनी पारडी शिवार पालथा घातला.यात त्यांना कन्हान नदीपासून २०० मीटर अंतरावर झुडपांमध्ये एक तर २२५ मीटरवर दोन असे तीन वेगवेगळे रेती साठे आढळून आले.ते तिन्ही रेतीसाठे इटगाव ( ता . पारशिवनी ) ते रोहणा ( ता . सावनेर ) दरम्यान आढळून आले आहेत.
पो.नि.प्रविण मुडे,पो.हवा. उमेश ठाकरे,नुमान शेख,राजु भोयर,प्रमोद भोयर तसेच पारशिवनी महसुल विभागाचे तहसिलदार यांचे आदेशाने तलाठी संकेत पालांदुरकर,तलाठी गणेश चौहान,कोतवाल मोरेश्वर शेंडे,पोलिस पाटिल देविदास घारड यांनी लगेच पंचनामा केला व रेतीसाठे जप्त केले.
ही संपूर्ण रेती एकूण १२५ ब्रास असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली असून,महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.या संपूर्ण रेतीची बाजारभावाप्रमाणे एकूण किंमत ७ लाख ५० हजार रुपये ( प्रति ब्रास सहा हजार रुपये ) असल्याचे तसेच यात वाहतूक खर्च समाविष्ट नसल्याचे जाणकार व्यक्तींनी सांगितले.
आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करणार असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.याप्रकरणी तपास पारशिवनी पोलिसांकडे व खापरखेडा पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला असुन पारशिवनी पोलिस आरोपीचा शोध घेत आहे..