पारशिवनी:- वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय नागलवाडी (वन्यजीव) यांचे द्वारा पश्चिम पेंचमधील सुवरधरा परिसरात निसर्गानुभव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी आणि शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा कोलीतमारा येथील ९० विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले, वन परिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण, राष्ट्रीय आदर्श विद्यालयाचे शिक्षक साक्षोधन कडबे, आश्रम शाळेचे शिक्षक श्री. चुटे यांनी जैवविविधता, वन व्यवस्थापन, खडकांचे प्रकार, जल-जमीन-जंगल व मानव यांच्यातील सहसंबंध, वनस्पती, पक्षी, फुलपाखरे यांचे निरिक्षण व ओळख, वनांचे महत्त्व, वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन या विषयावर मार्गदर्शन केले. जंगल का वाचवावे या विषयावर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. जंगल सफरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी निसर्गानुभव घेतले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com