पारशिवनी दिंनाक ९/१०/२०२२. पारशिवनी येथील सुन्नी जामा मस्जिद ट्रस्ट तर्फे घेण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरात ४० युवक व युवतीने रक्तदान करून सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला. शासकीय रक्तपेढी नागपूर व्दारे रक्त संकलन करणाऱ्या व्यक्तीला व युवतींना प्रमाणपत्रे देण्यात आली. या रक्तदान शिबिरात सर्व धर्मिय युवक. युवतीने सहभागी होऊन रक्तदान केले. तर मुस्लिम युवतीने प्रथमच रक्तदान करून राष्ट्रीय कार्याला अधिक बळकटी दिली.

या रक्तदान शिबीरला माजी मंत्री सुनील बाबू केदार. राजेंद्र मुळक ना जि अध्यक्ष . चन्द्रपालजी चौकशे पर्यटन मित्र. नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मीताई बर्वे. सौ. अर्चनाताई भोयर जिल्हा परिषद सदस्या. सभापती मिनाताई कावळे. उपसभापती चेतन देशमुख. तालुका अध्यक्ष दयाराम भोयर. श्रीधरजी झाडे. सहकारी संस्था अध्यक्ष अशोकराव चिखले. शिवहरी भड. पाणी पुरवठा सभापती सौ. अनिता ताई प्रमोद भड सभापती पाणीपुरवठा नगरपंचायत पारशिवनी. सौ. प्रतिभाताई कुंभलकर नगराध्यक्षा पारशिवनी नगरपंचायत. सौ. माधुरीताई भिमटे उपाध्यक्षा नगरपंचायत पारशिवनी. श्यामभाऊ भिमटे. दिवाकर भोयर. प्रकाशभाऊ डोमकी माजी सरपंच. पत्रकार गोपाल कडू. विजय भुते. सचिन सोमकुवर. तर प्रशासकीय अधिकारी पारशिवनी तहसीलदार प्रशांत सांगडे. ठानेदार राहूल सोनवणे आदिनी भेट दिली. सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून पारशिवनी शहरातील समाजसेत तत्परतेने सहभागी होणारे व आपल्या कार्यातून समाज हित जोपासण्यासाठी कार्य करणाऱ्या मान्यवराचा माजी मंत्री सुनील बाबू केदार व राजेंद्रजी मुळक हस्ते शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. त्यात सेवानिवृत्त शिक्षक व पत्रकार गोपाल कडू. माजी सरपंच प्रकाशजी डोमकी. डॉ. इरफान अहमद शेख. खुशाल कापसे आदर्श शिक्षक. पि. एस. आय. ज्ञानबा पळनाटे. पप्पूजी बोथरा. आदीना. गौरविण्यात आले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com