राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे उद्याची शैक्षणिक क्रांती :- प्र.कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे…

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

चिमूर :- स्थानिक गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय व गोडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शारिरिक शिक्षण विभागाकडून शारिरिक शिक्षकांचा अभ्यासक्रम व शारीरिक शिक्षकाची भूमिका या विषयावर विद्यापीठ स्तरीय एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली.

           कार्यशाळेचे उदघाटक म्हणून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली प्र-कुलगुरू डॉ‌.श्रीराम कावळे होते.त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की,आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली तर जगात भारत देश शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असेल.

           शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम, क्रेडिट व्यवस्था, त्याचे महत्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले पाहिजे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळेच उद्याची शैक्षणिक क्रांती होईल.

           ‘विकसित भारत -@2047’ ध्येय आपण पूर्ण करू. डॉ.धनजंय वेळूकर यांनी आपल्या बिजभाषणात म्हटले की, शारीरिक शिक्षकानी उच्च पदावर पोहचले पाहिजे. त्यांना ‘प्रोसेस टू’ ही संकल्पना माहीत असावी.

          राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शारीरिक शिक्षकाना विद्यार्थ्याच्या सर्वागिण व्यक्तीमत्व विकास करता येईल. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ अश्विन चंदेल यांनी केले. त्यानी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे खऱ्या अर्थाने शारीरिक शिक्षकाना न्याय मिळेल. क्रेडिट बेस सिस्टीम मुळे विद्यार्थ्याना लाभ मिळेल असे सांगितले.

            कार्यक्रमाचे अध्यक्ष गांधी सेवा शिक्षण समितीचे कोषाध्यक्ष प्रा.मारोतराव भोयर होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी प्रभावी झाली पाहिजे. तरच विद्यार्थ्यांना रोजगारांच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

          प्रथम सत्रात शारीरिक शिक्षकांचा अभ्यासक्रम अंमलबजावणी दुसऱ्या सत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व शारीरिक शिक्षकांची भूमिका या विषयावर साधक बाधक चर्चा झाली. डॉ.अनिता लेखंडे संचालक शा. शि. विभाग गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, डॉ. मनोज आरमरकर, डॉ.सुभाष शेकोकार, डॉ.अनिस खान, डॉ. महेशचंद्र शर्मा, डॉ महेश जोशी यांनी सहभाग घेतला.

           चर्चासत्रात गोंडवाना विद्यापीठातील विविध शारीरिक शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रसंगी निवृत्त व शिक्षण क्षेत्रातील उच्च पदस्थ शारीरिक शिक्षकांना सन्मानीत करण्यात आले.

        सूत्रसंचालन प्रा.डॉ.नितिन कत्रोजवार, प्रा आशुतोष पोपटे, आभार प्रा. डॉ. लक्ष्मण कामडी शारीरिक शिक्षण व क्रिडा संचालक डॉ. उदय मेंडूलकर यांनी केले. एक दिवशीय विदयापीठ स्तरीय कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकानी परिश्रम घेतले.