पूर्णा नदीच्या पात्रात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह… 

युवराज डोंगरे 

    उपसंपादक 

       खल्लार पो.स्टे.हद्दीतील जहानपूर शेत शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रात ३५ ते ४० वयोगटातील अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना काल दि.९ सप्टेंबरला सकाळी ११ वाजताच्या उघडकीस आली.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

          सदर घटनेची माहीती पोलिस पाटील नितिन सिरस्कार यांनी  खल्लार पोलिसांना दिली.माहीती मिळताच ठाणेदार राहुल जंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ना.पो.वंकेश नाकील यांनी घटनास्थळ गाठून पाण्यात तरंगत असलेला मृतदेह नागरिकांच्या मदतीने बाहेर काढला व पंचनामा करुन ओळख पटविण्यासाठी मृतदेह हा उपजिल्हारुग्णालय,दर्यापूर येथे ठेवण्यात आला.

         मृतक संबंधित खल्लार ठाण्यात मर्ग दाखल केला असून कलम १९४/बीएनएसएस नोंद करुन तपासात घेतला आहे.सदर इसमाबद्दल नागरिकांना काही माहिती असेल तर त्यांनी खल्लार पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन खल्लार पोलिस स्टेशनच्या वतीने नागरिकांना करण्यात आले.