चिमूर वनपरिक्षेत्रातंर्गत मौजा डोमा वन बिटात अस्वलाच्या पिल्लूचा मृत्यू… — गस्त घालत असताना वनविभागाच्या चमूला आढळून आला मृतदेह.‌‌..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

        वृत्त संपादीका 

      चिमूर वनक्षेत्रातंर्गत मौजा डोमा वरुन मुक्ताईला जाणाऱ्या मार्गाच्या कडेला वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अस्वलाच्या पिल्ल्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती पुढे आली आहे.

           चिमूर वनपरिक्षेत्रातंर्गत शंकरपूर उपवन क्षेत्रात मौजा डोमा गाव येतो आहे.डोमा बिट कक्ष क्रमांक ४७० अंतर्गत सकाळी वनविभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना अस्वलाचे दिडवर्षाचे पिल्लू मृत्यू पावल्याचे दिसून आले.

          घटनाक्रमाची माहिती साहाय्यक उपवनसंरक्षक गायकवाड,चिमूर वनपरिक्षेत्राधिकारी किशोर देऊळकर,शंकरपूर वनपाल औतकर,वनरक्षक सोनुले,बुरले,तरुण पर्यावरणवादी मंडळाचे अमोद गौरकर,विरेंद्र हिंगे,विजय गजभे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला.

          चिमूरचे आरोग्याधिकारी डॉ.राऊत,शंकरपूरचे आरोग्याधिकारी डॉ.देशमुख यांनी अस्वलाच्या पिल्ल्याच्या शवचे शवविच्छेदन केले.

         यानंतर अस्वलाच्या पिल्ल्याचे नियमानुसार प्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले.