रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमूर :- नाशिक जिल्ह्यातील शहा पांचाळे गावात अखंड हरिनाम सप्ताहात महंत रामगिरी महाराज यांनी प्रवचनात,”मुस्लिम समाजाचे धर्मगुरू पैगंबर हजरत मुहम्मद,यांचे चुकीच्या शब्दात वर्णन करून अपमान केला होता.
या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्यात. त्यामुळे महंत रामगिरी महाराज यांच्यावर कठोर कारवाई करून एफआयआर दाखल करून ताब्यात घ्यावे.
तसेच भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश नारायण राणे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी चिमुरतील मुस्लिम समाज रस्त्यावर उतरत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
आमदार नितेश राणे यांनी आम्ही मशिदींमध्ये घुसून,”मुस्लिम गांइूना मारु,या विधानाने मुसलमान समाजात भितीदायक तथा अशांत वातावरण निर्माण झाले आहे.
मुस्लीम एकता समाज संघनेने दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्याच्या मागणी साठी
सोमवारी नेहरु विद्यालय येथून उपविभागीय अधिकारी कार्यालया पर्यत मुस्लिम बांधवाद्वारे मूकमोर्चा काढण्यात आला.
दरम्यान उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेन्द्र फडनविस विरोधी पक्ष नेते ना.विजय वडेट्टीवार,खा.डॉ.नामदेव किरसान,जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना तंजिल रजा,हाफिज अनिस,हाफिज अमजद,हाफिज अजहर,मौलाना अन्सार,मोहम्मद सौद,मोहम्मद आरिफ,अजहर शेख,कलीम पठाण,पप्पू भाई शेख,आरिफ बाबू,रिजवान पठाण,अब्दुल राजिक,जमीर शेख,जावा शेख आदी समाज बांधव उपस्थित होते.