अनिलकुमार एन. ठवरे
ग्रामिण तालुका प्रतिनीधी आरमोरी
मानापूर :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान (उमेद) अतर्गत गरिबी निर्मुलन आराखडा (वि.पी.आर.पी.) च्या अनुषंगाने महिलांची जनजागृती भव्य मशाल रॉलीचे आयोजन करण्यात आले.यामध्ये विविध योजनांचे नारे देत भरारी प्रभास संघाच्या कार्यालया मथून रॉलीची सुरूवात करण्यात आली.मुख्य रस्त्यावरुन फिरून रॉलीची सांगता करण्यात आली.
वरिल कार्यक्रमास जय माता दी महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा सो.आशा वैरागडे,सो.काजल मोरघडे,कोषाध्यक्षा सौ.वंदना लाखनकार,संजीवनी महिला ग्रामसंघाच्या कोषाध्यक्षा सौ.सोनल रामटेके,सचिव सौ.बबिता किरंगे उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाला व्यवस्थापक सौ.सुषमा रणदिवे, आय.सी.आर.पी.श्रीमती ज्ञानेश्वरी गुरनूले.सौ.विजया लेनगुरे,सौ.रोहिणी लाखनकार, सौ.भूमिका रणदिवे,सौ.शिला लेनगुरे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच गावातील महिला,पुरूष व बालगोपाल सदर कार्यकक्रमास बहुसंख्येने उपस्थित होते.