कमलसिंग यादव

प्रतिनिधी

 

   पारशिवनी:- शहर असो किंवा गाव, आजच्या तरुणी कुठेही सुरक्षित नाहीत. मग मनात राहून राहून एकच प्रश्न निर्माण होतो. याला जबाबदार कोण? सरकार, पोलिस की खुद्द तरुणी? आधी दिल्लीतील अत्याचाराचे प्रकरण घडले. त्यानंतर आंदोलने झाली. पण गुन्हेगार पुन्हा मोकाटच सुटले नां. आता नुकतेच सेलु परभनी येथे नाभिक समाजाच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचं प्रकरण. किती भयानक आहे हे सगळे? एकापाठोपाठ कित्येक मुलींवर अत्याचार होतोहेत. स्त्री ही स्वभावत:च सोशिक, घाबरट, भिडस्त असल्याने आपण तिच्यावर बलात्कार केला, तर ती आवाज उठवणार नाही, अशी खात्री असे कृत्य करणाऱ्यांना वाटते. ते अगदी चुकीचे आहे. असे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सरचिटणीस पुर्व विदर्भ गोपाल कडू यांनी स्पष्ट केले. 

 

एखादी पीडित तरुणी समाजाला घाबरूनच गप्प बसते. ती वेळीच आवाज उठवत नसल्याने नराधमांचे चांगलेच फावते. दिल्लीमध्ये एका तरुणीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि त्यातून झालेला तिचा अंत या घटनेने देशातील वातावरण ढवळून निघाले होते. तिच्या प्रति आस्था वाटून मोर्चा काढला गेला, सरकारच्या निष्क्रियतेवर टीका झाली. या घटनेतील दोषींना फाशी देण्यात यावी, अशी मागणी केली गेली. एवढे सगळे होवूनही महिलांवर, अजाण मुलींवर होणारे अत्याचार व बलात्कार थांबले नाहीत. उलट अजूनच वाढताहेत. असे गुन्हे का घडताहेत. तरुणपणी किंवा प्रौढ वयात विषयवासना निर्माण होणे हे नैसर्गिक आहे. पण त्याला आवर घालणे, स्वतःच्या मनावर ताबा ठेवणे हा सुसंस्कृतपणा होय. वासना, आकर्षण आणि झिडकारले म्हणून बदल्याची भावना यामुळेही अशा घटना वारंवार घडत असतात. सगळ्यात मोठे कारण म्हणजे दारूची नशा आणि त्यात मनावरील नियंत्रण सुटते तसेच इंटरनेटवर मन विकृत करणाऱ्या क्लिप्स व टीव्हीवरील उत्तेजित करणारी दृश्य किंवा सीडीज् पाहणे यामुळेच भावनांचा उद्रेक होतो आणि त्यातून निष्पाप तरुणीचे जीवन संपुष्टात येते. तरुण मुले मोबाइलवरून अश्लील व्हिडिओ क्लिपस् एकमेकांना पाठवतात. कारणे काहीही असली, तरी बलात्काराचे गुन्हे घडतातच. मग ही विकृती का फोफावते याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

आज कित्येक तरुणी शिक्षणासाठी, नोकरीसाठी वा करिअरसाठी एकट्या अनोळखी शहरात घरच्यांपासून दूर राहतात. निर्जन रस्त्याने एकटीने जाणे योग्य नसते हे कळत असूनही पर्याय उपलब्ध नसल्याचे वाट काढून जातात. मग या अशा एकट्या मुलींना पाहून नराधमांचे डोळे विस्फारतात आणि अमानुष कृत्य घडतात. काही गुन्हेगार पकडले जातातही. पण नंतर पुरेशा पुराव्यांअभावी वा तपासातील त्रुटींमुळे लगेच सुटून पुन्हा अशा विकृत वासना घडतातच. प्रश्न असा पडतो की, बलात्कार करण्याची प्रवृत्ती का फोफावत आहे? याचे पहिले कारण म्हणजे देशात फोफावलेला भ्रष्टाचार. बलात्कार केल्यानंतर आपण पकडलो गेलो, तरी पोलिसांना मॅनेज करू शकू ही मानसिकता अशा गुन्हेगारांची झालेली आहे. त्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही. पोलिसांचा वचक राहिलेला नाही. मोठमोठे गुन्हेगार, राजकीय पुढारी हे बलात्काराच्या खटल्यातून निर्दोष सुटले आहेत. गुन्हा करणाऱ्याची दहशत, आपल्याला न्याय मिळणार नाही, कोणी मदत करणार नाही या भीतीपोटी अनेक प्रकरणे उघडकीस येत नाहीत. या सर्व अन्यायाचा बिमोड कसा करायचा? त्यांना आवर कसा घालायचा? हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. बलात्काराचे खटले चालविण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केली पाहिजेत. शिवाय कायद्यात सुधारणा केली पाहिजे. कायदे कडक व कठोर हवेत. हा गुन्हा ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’, असे समजून गुन्हेगारास फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे. पोलिसांची रस्त्यावर जास्तीत जास्त गस्त हवी. निर्मनुष्य रस्त्यावर पोलिस यंत्रणा सज्ज हवी, जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत. व्हिडिओ क्लिपस व अश्लील दृश्यांवर बंदी घालण्यात यावी. थोडक्यात म्हणजे जोपर्यंत समाजाची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांची समस्या कायम राहील. स्त्रियांनी आपल्या संरक्षणाची काळजी ही स्वतःच घ्यावी. कोणी मदतीला येईल आणि आपले रक्षण करेल ही भ्रामक कल्पना न करता अन्यायाचा प्रतिकार करायला शिकले पाहिजे. समाजातील एकूण चित्र पाहिले, तर आजची स्त्री अद्यापही सुरक्षित नाही एवढे मात्र खरे आहे.

   आज नाभिक समाज हा अल्पसंख्याक असुन महाराष्ट्र सरकारने आता तरी अँक्टिसीटी अँक्ट कायद्याचे समाजाला संरक्षण दिले पाहिजे. व अत्याचार. बलात्कार प्रकरणातील आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आल्यावर न्यायालयाने आरोपींना दया न दाखवता फाशीची शिक्षा. आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली पाहिजे. तरच समाज मन सुन्न करणार्‍या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com