सावली(सुधाकर दुधे)
– माजी मंत्री तथा ब्रम्हपुरी क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी यशवंतराव चव्हाण घरकुल व वसंतराव नाईक तांडा वस्ती योजना राबविल्याबद्दल भटक्या जाती विमुक्त जमाती आघाडीचे वतीने सत्कार करण्यात आला.
महाविकास आघाडीच्या काळात माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडे बहुजन विकास भटक्या जमातीचे खाते होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात सावली तालुक्यात भटक्या जाती जमाती वसाहतीत वसंतराव नाईक मुक्त वसाहत योजनेंतर्गत 5 कोटींची कामे मंजूर केली. तसेच यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेंतर्गत 419 घरकुल मंजूर केले त्यामुळे पंचायत समिती सावली येथे महा आवास अभियान कार्यक्रमात आमदार विजय वडेट्टीवार यांचा काँग्रेस प्रणित भटक्या जाती विमुक्त जमाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय कोरेवार, प्रमोद दाजगाये, संदीप भोयर, कमलेश ठाकरे, पंकज कागदेलवार, हरिदास मेश्राम, वेनुदास भोयर, श्रीकांत बहिरवार, भारत मराठे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.