पारशिवनी:- नगर परिषद कन्हान – पिपरी अंतर्गत प्रभाग १,२, आणी ४ प्रभागातील सिमेट रोड, नाली बाधकाम, पेव्हीन ब्लॉक्स बसविणे चे बाधकामाचे एकुण ७० लाख रुपयांचे बाधकामा चे भुमीपुजन न प कन्हान ची नगराध्यक्ष करुणाताई आप्टनकर यांची अध्यक्षेत श्रेत्रातील आमदार जैस्वाल जी यांचे हस्ते बाधकामा चे भुमीपुजन करण्यात आले .
शुक्रवार दिनांक ९ सेप्टेंबर ला नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्र. १ – येथील श्री. गजभिये ले-आऊट येथे श्री. विशाल वानखेडे ते श्री. तुळशिराम गजभिये यांच्या घरापर्यंत पेव्हींन ब्लॉक्स बसविणे रु. १२,९५,८९० लक्ष,
गजभिये ले-आऊट येथे श्री. सिद्धार्थ ढोके ते श्री. गजभिये यांच्या घरापर्यंत आ.सी.सी. नाली बांधकाम रु. १०,४५,६७० लक्ष व
इंदिरा नगर येथे श्री. कोहळे ते ठाकरे यांच्या घरापर्यंत आ.सी.सी. नाली बांधकाम रु. २०,३५,६२० लक्ष,
प्रभाग क्र.२- येथे आनंद नगर येथे श्री. लालचंद राऊत ते श्री. पंकज रामटेके यांच्या घरापर्यंत आ.सी.सी. नाली बांधकाम रु. १६,१७,४०९ लक्ष व
प्रभाग क्र.४- रामनगर ले-आऊट येथे श्री. जितूभाई पटेल ते श्री. डॉ.सचिन वानखेडे यांच्या पर्यंत आ.सी.सी. रोड बांधकाम रु. १०,०१,३९३ लक्ष अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. या प्रसंगी कन्हान पिपरी नगर परिषद अध्यक्षा करुणाताई अनिल आष्टणकर, श्री. वर्धराजजी पिल्ले, नगरसेवक विनय यादव, राजेन्द शेदरे , अर्जुन पात्रे, चिंटुं वाकुडकर, चन्दशेखर बोरकर,नगरसेविका कल्पना नितनवरे, गुफा तिडके, सुषमा चोपकर, अनिता पाटील, संगिता खोब्रागडे, शुभांगी घोघले , मनिषा चिखले,तसेच कन्हानवासी मोठयासंखेने उपस्थित होते.