युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापूर येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते आंबेडकर चळवळीशी सदैव एकनिष्ठ असणारे संजय चौरपगार यांची अमरावती पश्चिम जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
संजय चौरपागर हे १९९९ पासून आंबेडकर चळवळीशी एकनिष्ठ राहले त्यांनी दर्यापूर येथील अतिक्रमण झोपड्या नियमाकुल करण्यासाठी अनेक वेळा आंदोलन केले.
विजेच्या बिलासाठी पिण्याच्या पाण्यासाठी,भंगार बसेस बंद करण्यासाठी अश्या अनेक प्रकारची आंदोलन केले त्यांचा कार्याचा आढावा घेत वंचीत बाहुजन आघाडीने संपूर्ण जिल्ह्याची धुरा त्याच्यावर सोपविण्यात आली असून त्याची अमरावती पश्चिम जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
यासह पदभार स्वीकारताना त्यांनी पक्षाच्या हिताचे कार्य पक्ष बांधणी करत पक्ष सोबत निस्वार्थ भावनेने सेवा देईल असे त्यांनी व्यक्त केले जिल्ह्याची यशस्वी धुरा सांभाळण्यासाठी त्याच्यावर विविध स्तरावरून अभिंनदन होत आहे.
सदर नियुक्ती ही वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष रेखा ताई ठाकूर,युवकचे प्रदेश अध्यक्ष डॉ.निलेश विश्वकर्मा अमरावती जिल्ह्याचे निरीक्षक डॉ.धर्यवर्धन पुंडकर यांनी केली आहे.