हक्क संरक्षणासाठी आदिवासींनी संघटित होऊन लढा उभारला पाहिजे :- रामदास मसराम यांचे प्रतिपादन

         पंकज चहांदे

देसाईगंज/वडसा तालुका प्रतिनिधी 

              दखल न्यूज भारत

देसाईगंज :- या देशातिल मुलनिवासी असलेल्या आदिवासी समाजावर शासन व्यवस्थेच्या माध्यमातुन व काही अराजक तत्वांच्या माध्यमातुन सातत्याने अन्याय होत आहे. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातुन या समाजाची उन्नती व्हावी यासाठी बहाल केलेल्या अधिकारांना संपुष्टात आनण्याचे कट कारस्थान राज्य व्यवस्था व न्याय व्यवस्थेच्या माध्यमातुन केले जात आहे.

             आपले हक्क व अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आदिवासी समाजाने संघटित होऊन समाजहित संरक्षणाचा लढा उभारला पाहिजे, असे प्रतिपादन आदिवासी नेते रामदास मसराम यांनी केले.                                    

       ९ आगस्ट जागतिक मुल निवासी व आदिवासी दिनाचे औचित्य साधुन देसाईगंच्या क्रांतीसुर्य बिरसामुंडा समितिच्या वतिने फवारा चौकात जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तुकुम वार्डातुन परंपरागत आदिवासी रेला नृत्य सादर करित आदिवासी बांधव मोठ्या संख्येने कार्यक्रम स्थळी उपस्थित झाले. 

        कार्यक्रमाला संबोधीत करतांना आदिवासी नेते रामदास मसराम म्हणाले की, या देशात आदिवासी समाजावर प्रस्थापित व्यवस्थेच्या माध्यमातुन सातत्याने अन्याय केला जात आहे, मनिपुर मध्ये आदिवासी समाजबांधवांच्या कत्तली केल्या जात आहे, महिलांवर सातत्याने अत्याचार होत आहे.मात्र या देशातील शासन व्यवस्था याकडे अजिबात लक्ष देत नाही.

          कोणत्याही समाजाच्या घटनादत्त आरक्षणावर निर्णय घेण्याचे अधिकार केवळ या देशाच्या संसदेलाच असतांना आठवडाभरा पुर्वी माननिय सर्वोच्च न्यायालयाने असंवैधानिक मार्गाने निर्णय देत या देशातिल एससी व एसटी समुदायाला ऱाज्यघटनेने बहाल केलेल्या आरक्षणावर क्रिमिलेयर ची अट लावली. खरे पाहता या समाजांना उन्नतीच्या शिखरावर पोहचण्यासाठी अजुनही संधी उपलब्ध झालेली नाही.

          आजही हा समाज दारिद्र्याचे जिवन जगतो आहे या देशातिल नैसर्गीक साधन संपत्तीचे रक्षण करण्याचे काम अतिदुर्गम भागातिल आदिवासी समाज करत आहे. अजुनही या समाजाला आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध होत नाही.नैसर्गीक साधन संपत्तीचे रक्षण करणाऱ्या आदिवासी बांधवांची गोड्या झाडुन हत्या केली जाते. पण कोणीही आवाज उचलत नाही. आज परिस्थिती अनुकुल नसतांनाही आदिवासी विद्यार्थी अतिशय मेहनत घेवुन स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातुन स्व:ताला सिद्ध करण्यासाठी कसोशी चे प्रयत्न करत आहेत.

            आदिवासी समाजात विविध जातिंचा समावेश करुन या समाजाचे अधिकाराची फाळणी करण्याचे कट कारस्थान या देशाच्या शासन व्यवस्थेकडुन केले जात आहे. ही बाब या समाजाच्या आर्थीक शैक्षणिक व राजकिय उन्नतिला मारक असुन त्यात क्रिमिलेयरची अट लावने म्हणजे भारतिय राज्यघटनेने या समाजाच्या उन्नतीसाठी आरक्षणाच्या माध्यमातुन दिलेल्या अधिकारांचा खुन करणे होय. हक्क व अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आदिवासी समाजाने संघटित होऊन लढा उभारला पाहिजे असे परखड मत रामदास मसराम यांनी व्यक्त केले.

             यावेळी कार्यक्रमाला कसारी चे माजी सरपंच राघोजी कुमरे, ऍड. राजेंद्र मरसकोल्हे, शशिकांत मडावी, माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, पं.स. समिती माजी सभापती परसराम टिकले, जि.प. माजी सभापती नाना नाकाडे, नितिन राऊत, विजय बन्सोड, डॉ.आशिष कोरेटी, गणेश काटंगे, इनवते यांचेसह मान्यवर उपस्थित होते.

      या कार्यक्रमात प्राविण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनिल उईके, अमित केरामी, डॉ. विजय उईके, विजय भलावी, उमेश उईके, खुशाल उईके, सुखदेव जुमनाके, मारोती जुमनाके यांचेसह क्रांतिसुर्य बिरसामुंडा समितिच्या सदस्यांनी अविरत प्रयत्न केले. 

     कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बंडु सिडाम व आभार प्रदर्शन मिलिंद उईके यांनी केले कार्यक्रमाला बहुसंख्य आदिवासी समाज उपस्थित होता.