युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
नुकतीच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांचे सुचनेनुसार व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे देखरेखीत डॉ.पंजाबराव देशमुख सभगृह येथे केंद्रप्रमुख पदोन्नती करिता समुपदेशन प्रक्रिया पार पडली.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने दि.९फेब्रुवारिला केलेल्या आंदोलनाच्या दरम्यान तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली.
यानंतर उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदोन्नती कडे शिक्षकांचे लक्ष वेधले आहे. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळाल्याने शिक्षकांनी अखिल प्राथमिक शिक्षक संघबद्दल व जिल्हा परिषद प्रशासनबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
2013 पासून रखडल्या केंद्रप्रमुख पदोन्नती चा या वर्षी मुहूर्त निघाला. अमरावती जिल्हा परिषदेतील जवळपास ५३ शिक्षक व मुख्याध्यापक यांना केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळाली. या पदोन्नती करिता 160 शिक्षक, मुख्याध्यापक यांची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.
सेवाज्येष्ठता यादीत 104 क्रमांक वर असलेले श्री. राजकुमार गायकी हे या पदोन्नती मधील अंतिम लाभार्थी ठरले आहे. अल्पावधीतच ९७ शिक्षकांना उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदी पदोन्नती मिळणार आहे.
पदोन्नती प्रक्रिया राबविल्याबद्दल अखिल संघाचे नेते किरण पाटील, जिल्हाध्यक्ष गजानन चौधरी, सरचिटणीस सुभाष सहारे , संजय साखरे नीलकंठ यावले, प्रमोद दखणे, प्रमोद घाटोळ, राजेंद्र तामस्कर, संजय वाटाणे, पी.एम. भगेवार, भूषण ठाकूर, संदीप घाटे, उज्ज्वल पंचवटे आदींनी समाधान व्यक्त केले. असे प्रसिद्धी प्रमुख सुरज मंडे यांनी कळविले आहे.